घरमहाराष्ट्रNarendra Modi : साईबाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सगळं व्यवस्थित करतील -...

Narendra Modi : साईबाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सगळं व्यवस्थित करतील – सुरेश वाडकर

Subscribe

शिर्डी : सध्या जे काही प्रश्न आहेत, ते पंतप्रधान मोदी अत्यंत सक्षमरित्या हाताळतील, त्यावर तोडगा काढतील. साईबाबांनीच मोदींना बसवलं आहे, ते सर्वकाही चांगलं करतील. मला वाटतं देवी-देवतांनीच पंतप्रधान मोदींची नेमणूक केली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी नुकतीच शिर्डी देवस्थानला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. शिर्डीचे बदललेले रूप अत्यंत कौतुकास्पद आहे. शिर्डीत आता खूप सुविधा झाल्या आहेत. दर्शन घेणे सोपे झाले आहे. मंदिर प्रशासनही भाविकांना मदत करत असते, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील राजकारणाबाबत त्यांचे मत जाणून घेतले. सुरेश वाडकर म्हणाले की, मी गाण्यात रमणारा माणूस आहे. मला राजकारणातलं काही कळत नाही. पण साईबाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सर्व काही चांगलं करणार. मला वाटतं देवी-देवतांनीच पंतप्रधान मोदींची नेमणूक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Narendra Modi : सारा खेळ खुर्चीचा; सभा मोदींची आणि खुर्च्यांवर फोटो राहुल गांधींचे, काय आहे प्रकार?

काय म्हणाले सुरेश वाडकर?

“मी गेली अनेक वर्ष शिर्डीत येत आहे. साईबाबांकडे मी कधीच काही मागितले नाही. इथे मातीची वाट होती तेव्हापासून मी शिर्डीत येत आहे. साईबाबांकडून प्रत्येकाची मागणी पूर्ण होत असते. म्हणूनच येथे भाविकांची खूप गर्दी असते. नाशिकमध्ये मी वरचेवर येत असतो. तेव्हा प्रत्येक दोन किलोमीटरवर मला शिर्डीला पायी येताना कुणी ना कुणी दिसतं”, असे वाडकर यावेळी म्हणाले. सुरेश वाडकर पुढे म्हणाले, पूर्वी मी शिर्डीत यायचो तेव्हा तासनतास मंदिरात बसून साईंना पाहत बसायचो. पण आता लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत. मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन अतिशय योग्य पद्धतीने भाविकांची काळजी घेते. अतिशय उत्तम पद्धतीने येथील व्यवस्था राबविली जाते.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : पवार घराणे शरद पवारांसोबतच, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

बाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सगळं व्यवस्थित करतील…

यावेळी पत्रकारांनी महाराष्ट्रातील आरक्षण आणि इतर राजकीय प्रश्नांबाबत सुरेश वाडकर यांना बोलते केले. यावर ते म्हणाले की, मला राजकारणाबद्दल काहीही कळत नाही. मी कलाकार माणूस आहे. सध्या जे काही प्रश्न आहेत, त्याबद्दल बाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सगळं व्यवस्थित करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -