Raigad Anganwadi Sevika : अंगणवाडीसेविकांच्या हाती स्मार्टफोन

Raigad Anganwadi Sevika : अंगणवाडीसेविकांच्या हाती स्मार्टफोन

अलिबाग : अंगणवाडीसेविकांचं गावपातळीवरील काम खूप महत्त्वपूर्ण आहे. कुपोषित मुले, मुलांचा आहार, गर्भवती, एकात्मिक बालविकास प्रकल्प अंगणवाडीसेविकांशिवाय अपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांच्या कामासंदर्भातील पोषण ट्रॅकर अॅप अपडेट करण्यासाठी अंगणवाडीसेविकांना स्मार्टफोन देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यातील ३,२०४ स्मार्टफोनचे वाटप शुक्रवारी (१२ एप्रिल) रायगड जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका आणि पर्यवेक्षिका यांना करण्यात आले.

अंगणवाडीसेविकांच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे. त्यातुलनेत त्यांना मिळणारे मानधन कमी आहे. यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली, मोर्चे काढले. त्यानंतर थोडी-थोडी वाढ त्यांना मिळाली. त्यांच्या कामावर विश्वास कामाला गती मिळावी आणि केलेल्या कामाची माहिती अपडेट राहावी यासाठी त्यांना स्मार्टफोन देण्यात आलेत. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत तब्बल ३,२०४ स्मार्टफोन रायगड जिल्ह्यात देण्यात आले, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी दिली आहे.

हेही वाचा… Raigad Tourism : मुरूड, काशीदमध्ये पुन्हा पर्यटकांची पाऊले

अंगणवाडीसेविकांची जबाबदारी

एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावात अंगणवाड्यांचे काम चालते. मोठ्या अंगणवाड्यांच्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस असतात आणि मिनी अंगणवाडीत सेविका हे एकच पद आहे. अंगणवाडीत सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना शिकवले जाते, तसेच सेविकांकडून शासकीय अनेक कामे केली जातात. यात गरोदर महिला, कुपोषित बालके, त्यांचा आहार आणि त्यांचे कुटुंबीय, लसीकरण शिवाय सरकारच्या आदेशानुसार होणारे सर्वेक्षण यांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी अंगणवाडीसेविकांकडे असते.

हेही वाचा… Raigad Water Crisis : दे माय… पाणी दे, पाणी दे!

…म्हणून स्मार्टफोन

अंगणवाडीसेविकांकडे कामाचा खूप ताण असतो. त्यांना या आधी दिलेले फोन जुने झाले होते आणि ते हँग व्हायचे. त्यामुळे अहवाल देण्यात अडचणी यायच्या आणि विलंब व्हायचा. म्हणून सरकारने त्यांना स्मार्टफोन देण्याचा निर्णय घेतला होता. या स्मार्टफोनमध्ये अंगणवाडीच्या कामकाजाविषयी अॅप दिले आहे. त्यामुळे त्यांना काम करणे सोपे जाणार आहे, अशी माहिती मुरुडचे बालविकास प्रकल्प अधिकारी संजय शेडगे यांनी दिली. रायगड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांच्या मार्गदर्शनाखाली 3 हजार ९८ अंगणवाडीसेविका आणि १०६ पर्यवेक्षिका यांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले.

तालुकानिहाय स्मार्टफोन वाटप

First Published on: April 14, 2024 1:50 AM
Exit mobile version