घरमहाराष्ट्रRaigad Water Crisis : दे माय... पाणी दे, पाणी दे!

Raigad Water Crisis : दे माय… पाणी दे, पाणी दे!

Subscribe

ऐन उन्हाळ्यात पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आटल्या, ओढे-वाहाळ कोरडेठाक झाले आहेत. डोंगराळ भागात महिलांना पाण्यासाठी पायपीट रणरणत्या उन्हात पोराबाळांसह पायपीट करावी लागत आहे.

पोलादपूर : सूर्याने आग ओकणे वाढवल्याने राज्यातील बहुतांश भागात भीषण पाणीटंचाईची समस्या उभी ठाकली आहे. याला रायगड जिल्ह्याचाही अपवाद नाही. वाढता उन्हाळा, आटणारे जलस्त्रोत आणि अपूर्ण राहिलेल्या जलजीवन मिशन योजना यामुळे ग्रामीण भागातील जनता मेटाकुटाला आली आहे. त्यातुलनेत तत्परतेने रायगड जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे लोकांच्या घशाला कोरड पडली आहे. जनता तहानलेली असताना भावी खासदार मात्र प्रचारात मश्गुल झालेले चित्र रायगडमध्ये दिसते. (Raigad Water Crisis)

हेही वाचा… Raigad District News : रायगड जिल्हात ‘जलजीवन’च्या ‘गारंटी’चे तीन तेरा

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात वहाळांचे वाळवंट झाले आहे, बहुतांश विहिरींनी तळ गाठलाय, तरी अनेक विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या हालाला पारावार राहिलेला नाही. त्या पाण्यासाठी रात्रीसुद्धा पायपीट करत आहेत. या वर्षी २४ गावे आणि ४४ वाड्यांवर पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलादपूर पंचायत समितीकडून पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा कागदावरून प्रत्यक्षात कधी उतरेल, याची लोक वाट पाहत आहेत. (Panyachi Bombabomb)

हेही वाचा… Raigad Rasayani News : हाल, गैरसोयीचे नाव रसायनी रेल्वे स्टेशन

- Advertisement -

डोंगराळ, दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात वसलेल्या वाडयावस्त्यांवर मागील सहा दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई उद्भवली आहे. इथल्या महिला रणरणत्या उन्हात पोराबाळांसह पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. काही वस्त्यांमधील बायाबापड्या ओढ्यात, वाहाळात खडडे खोदून पाणी वाडग्याने भरताना दृष्य पाहणे खूपच त्रासदायक आहे. मात्र मागणी अर्ज करूनही शिवाय टॅकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश प्रांताधिकारी कार्यालयाकडून मिळूनही पोलादपूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. त्यामुळे येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे दे माय…पाणी दे, पाणी दे… असा आर्त टाहो महिला फोडत आहेत.

पोलादपूर तालुक्यातील तुटवली गावात तर भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या गावाच्या गळतीच्या धनगरवाडीतील ग्रामस्थांवर तर डोळ्यातील अश्रू पिण्याची खडतर वेळ आली आहे. तसेच कातळी. दत्तवाडी कातळी. कामतवाडी. मोरागिरीत धनगरवाडी, क्षेत्रफळ-धनगरवाडी, क्षेत्रफळ-आमलेवाडी या वाड्यांतील ग्रामस्थांचे पाण्यावाचून अतोनात हाल होत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने तहानलेल्या गावांची अधिक वाट न पाहाता तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी तहानलेले गाव, वाड्यावस्तीतील जनता करत आहे. यांना आता तरी सरकार दिलासा देणार का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -