अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीचा घटनाक्रम संशयास्पद; चौकशी NIA कडे द्यावी – फडणवीस

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीचा घटनाक्रम संशयास्पद; चौकशी NIA कडे द्यावी – फडणवीस

स्फोटकांची स्कॉर्पिओ: या प्रकरणात अंबानींची तक्रार कुठे आहे?; असीम सरोदेंचा सवाल

देशातील श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली स्कोर्पियो गाडी सापडली होती. हा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडी सापडली, हा घटनाक्रम संशयास्पद आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या घटनेची चौकशी NIA कडे द्यावी अशी मागणी देखील फडणवीस यांनी सभागृहात केली.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले, ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिलं होतं. पण तसं कुठलं खातंच नव्हतं. या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या पोहोचल्या होत्या. गाडी ओळखल्याबरोबर सचिन वझे पहिल्यांदा पोहोचले. तीन दिवसांपूर्वी तपासातून सचिन वझे यांना काढले. ज्यांची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाल्याचे समोर आले. वझे ठाण्यातील, गाड्या ठाण्यातील आणि या दोघांचा आधीपासून संवाद होता. शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी NIA ला द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.


हेही वाचा – नाशिकमध्ये स्टॅम्प घोटाळा उघड, देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल


 

First Published on: March 5, 2021 4:15 PM
Exit mobile version