राजकारण संपल असेल तर, आता कोरोनाकडे लक्ष देऊया – उद्धव ठाकरे

राजकारण संपल असेल तर, आता कोरोनाकडे लक्ष देऊया – उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या ममता बॅनर्जी यांचे कौतुक करतानाच एक अलर्टही दिला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता निवडणुकांच्या निकालानंतरच आलेली उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. ममता दीदींच्या लढवय्या वृत्तीचे कौतुक करतानाच, त्यांनी देशासमोरील आणि राज्यासमोरील आव्हानेचीही आठवण ममता दीदींना करून दिली आहे. ममता दीदींचे कौतुक करतानाच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता दीदींना फोनकॉलकरून शुभेच्छाही दिल्या. पण विजयश्री खेचून आणल्यानंतर त्यांनी दीदींना आणखी एका गोष्टीची आणि संकटाची आठवण करून दिली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

ममता जिंकल्या ! आता कोरोनाकडे लक्ष देऊया : उद्धव ठाकरे

ममता बॅनर्जी या ‘बंगाली’ जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागे. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपुर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकटवली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरोधातील लढाईकडे लक्ष देऊया.

– मा. उद्धव ठाकरे,
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख

First Published on: May 2, 2021 7:58 PM
Exit mobile version