बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर थोरातांची ही भूमिका असल्याचं कळतंय. बाळासाहेब थोरात आज दिल्लीमध्ये आहेत. केसी वेणूगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन यासंदर्भात थोरात त्यांची भूमिका मांडतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदलांची चर्चा सातत्याने सुरु आहे. यासंदर्भात वेगवेगळी नावं देखील पुढे आली होती. दरम्यान, आज बाळासाहेब थोरात दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन आपली भूमीका मांडणार आहेत.

मुंबई काँग्रेससह संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून बदलांची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात वेगवेगळी नावं देखील पुढे आली होती. काहींनी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे असा आरोप केला होता. शिवाय, बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुल मंत्रीपद आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे तीन तीन जबाबदाऱ्या आहेत, अशी चर्चा सुरु होती. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन दुर होण्याचं ठरवल्याचं बोलंल जातंय. बाळासाहेब थोरात रविवारपासून दिल्लीत आहेत. आज ते केसी वेणूगोपाल राव आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत.

काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये नुकतेच संघटनात्मक बदल केले होते. काँग्रेसने भाई जगताप यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. तसेच मुंबई कार्यकारिणीत बदल करण्यात आले. शिवाय मुंबई काँग्रेससाठी नव्या प्रभारीची नियुक्तीही करण्यात आली. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या मागणीनेही जोर धरला होता. त्यामुळे थोरात यांच्या दिल्ली भेटीकडे सर्वच राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.

 

 

First Published on: January 4, 2021 11:41 AM
Exit mobile version