Maharashtra Corona Update: महाराष्ट्रातील ‘या’ १२ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरता

Maharashtra Corona Update: महाराष्ट्रातील ‘या’ १२ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरता

Maharashtra Corona Update: महाराष्ट्रातील 'या' १२ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरता

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. मागील अनेक दिवसांपासून ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णवाढ होत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ४७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे महाराष्ट्राची बिकट परिस्थिती झाली आहे. पण अशा परिस्थिती महाराष्ट्रासाठी एक पॉझिटिव्ह बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मागील १५ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या प्रकरणात घट दिसून आली आहे. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, वाशिम, नंदूरबार, औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातून, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोना आलेख उतरता दिसत आहे.

एकाबाजूला महाराष्ट्रात जरी कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसऱ्या बाजूला या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे आणि ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.

काल रविवारी राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली. २४ तासांत ५६ हजार ६४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६६९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७ लाख २२ हजार ४०१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७० हजार २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६ लाख ६८ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच राज्यात काल दिवसभरात ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: भारतात कोरोनाविरोधी मुकाबल्यासाठी लवकरच येणार चौथी लस, Pfizer – भारत सरकारमध्ये चर्चेला सुरुवात


 

First Published on: May 3, 2021 5:39 PM
Exit mobile version