Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 59 नवे रुग्ण, 71 कोरोनामुक्त

Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 59 नवे रुग्ण, 71 कोरोनामुक्त

देशासह राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 59 नवे रुग्ण आढळून आले तर 71 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील अॅटिव्ह रुग्णांची संख्या देखील एक हजारांच्या खाली आली आहे. सध्या राज्यात 634 अॅटिव्ह रुग्ण आहेत. विशेष म्हणजे राज्यातील कोरोना मृत्यांची संख्या रोज शून्यवरच आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण जरी आढळून येत असले तरी मृतांची संख्या फार कमी आहे. गेल्या 24 तासात राज्यात 71 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. तर आत्तापर्यंत राज्यात 77,27, 443 रुग्ण कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत कोरोनाच्या 7, 98, 84, 936 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

राज्यात सध्या 634 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मुंबई आणि पुण्यात आहे. मुंबईत सध्या 357 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर पुण्यात 143 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


शीख गुरू तेज बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त PM मोदी देशवासीयांना करणार संबोधित

First Published on: April 18, 2022 9:25 PM
Exit mobile version