घरदेश-विदेशशीख गुरू तेज बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त PM मोदी देशवासीयांना...

शीख गुरू तेज बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त PM मोदी देशवासीयांना करणार संबोधित

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल रोजी शीख गुरु तेज बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदी शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 400 रागी (शीख संगीतकार) यावेळी ‘शब्द कीर्तन’ गातील. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशातील आणि जगातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी होणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववे शीख गुरु तेज बहादूर यांच्या प्रकाश पर्व (जन्म उत्सव) दिल्लीतील शिशगंज गुरुद्वाराला भेट दिली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

मोदींनी ट्विट करत म्हटले की, आज मी गुरुद्वारा शिशगंज साहिब येथे प्रार्थना केली. श्री गुरू तेज बहादूर जी यांचे जीवन, आदर्श आणि सर्वोच्च बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही. मोदींनी त्यांची काही छायाचित्रेही ट्विट केली होती. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी जेव्हा गुरुद्वारात गेले तेव्हा सर्वसामान्यांच्या सोयीसाठी रस्त्यावर कोणताही पोलिस बंदोबस्त नव्हता आणि नाकाबंदीही करण्यात आली नव्हती.

विशेष म्हणजे केंद्र सरकारने गुरु तेज बहादूर यांचे 400 वे प्रकाश पर्व थाटामाटात साजरे करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. या संदर्भात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठकही नुकतीच झाली. या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, गुरु तेज बहादूर यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. तत्पूर्वी, आणखी एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले होते की, “श्री गुरू तेज बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाच्या विशेष प्रसंगी मी त्यांना नमन करतो. मागासवर्गीयांच्या सेवेसाठी त्यांच्या धाडसासाठी आणि प्रयत्नांसाठी जगभरात त्यांचा आदर केला जातो. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध झुकायला त्यांनी नकार दिला. त्यांचे सर्वोच्च बलिदान अनेकांना शक्ती आणि प्रेरणा देते.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -