Maharashtra Corona Update: राज्यात सोमवारी ८ हजार ७४४ नव्या रुग्णांची नोंद, २२ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: राज्यात सोमवारी ८ हजार ७४४ नव्या रुग्णांची नोंद, २२ जणांचा मृत्यू

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मुंबईत २४ तासात ६७६ तर राज्यात १ हजार कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात आज सोमवारी ८ हजार ७४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात आज २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा २.३६ टक्के इतका आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट हा ९३.२१ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ९ हजार ६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात २० लाख ७७ हजार ११२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत १ कोटी ६९ लाख ३८ हजार २२७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २२ लाख २८ हजार ४७१ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ४ लाख ४१ हजार ७०२ लोक होम क्वारंटाईन आहेत. तर ४ हजार ९८ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात सध्या ९७ हजार ६३७ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत ३३ लाख ४५ हजार ५८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत सध्या ९ हजार ३७३ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्याचबरोबर ठाण्यात आतापर्यंत २८ लाख ६३ हजार ३५१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ठाण्यात सध्या १० हजार ३९७ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या १ हजार १४८ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर पुण्यात १९ हजार ३० कोरोना अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ५२९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या औरंगाबादमध्ये ४ हजार ४७२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात सध्या १२ हजार २१९ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


हेही वाचा – Corona Update: मुंबईत आज १ हजार ८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

First Published on: March 8, 2021 9:37 PM
Exit mobile version