Maharashtra Corona Update: अनलॉकचा परिणाम! आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ; मृत्यूदर १.९७ टक्क्यांवर

Maharashtra Corona Update: अनलॉकचा परिणाम! आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ; मृत्यूदर १.९७ टक्क्यांवर

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना पुन्हा फोफावतोय, २४ तासात १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यातील दैनंदिन नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्यामुळे आणि पॉझिटिव्ह रेट वाढत असल्यामुळे काही दिवसांपासून अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पॉझिटिव्हीटी रेट आणि बेड्सच्या क्षमतेनुसार राज्यातील जिल्ह्यांमध्ये अनलॉक केले जात आहे. त्यानुसार काही जिल्हे अनलॉक झाले असून काही जिल्ह्यांमध्ये अजून लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू आहे. पण आता अनलॉकचा परिणाम हळूहळू दिसून येत आहे. काल कोरोना मृत्यूची संख्या २०० हून अधिक होती आज हिच संख्या कमी झाली आहे. तर काल नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. मात्र आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ३६१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख ७२ हजार ७८१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख १७ हजार ९६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ९ हजार १०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ५७ लाख १९ हजार ४५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७ टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या १ लाख ३२ हजार २४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९५ लाख १४ हजार ८५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ७२ हजार ७८१ (१५.१२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ९६ हजार २९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ६८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – Corona Vaccination: ..यामुळे उद्यापासून मुंबईत १८ ते २९ वयोगटातील लसीकरण करण्यात येणार नाही


 

First Published on: June 20, 2021 8:57 PM
Exit mobile version