Maharashtra Corona Update: दिलासा! गेल्या २४ तासात बाधितांची संख्या घटली; ९,६७७ नवे रूग्ण तर १५६ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: दिलासा! गेल्या २४ तासात बाधितांची संख्या घटली; ९,६७७ नवे रूग्ण तर १५६ जणांचा मृत्यू

Corona Update:

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप असला तरी राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. असे असले तरी आज दिलासादायक बाब म्हणजे राज्यात गेल्या २४ तासात करण्यात आलेल्या कोरोनाबाधित रूग्णांसह मृतांच्या आकड्यातही तितकीच घट झाली आहे. गुरूवारी राज्यात ९,८४४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता तर १९७ जणांचा कोरोनाने बळी गेला होता. यातुलनेत आज शुक्रवारी राज्यात गेल्या दिवसभरात ९,६७७ नव्या कोरोना बाधित रूग्णांचे निदान करण्यात आले तर १५६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ६०,१७,०३५ झाला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांचा आकडा १,२०,३७० इतका झाला आहे.

१०,१३८ जणांनी केली कोरोनावर यशस्वी मात

दरम्यान, राज्यात आज १५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा झाला आहे. दिलासादायक म्हणजे राज्यात बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज १०,१३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५७,७२,७९९ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९४ % एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०५,९६,९६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,१७,०३५ (१४.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३३,७४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू

आज नोंद झालेल्या एकूण १५६ मृत्यूंपैकी ११७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३५५ ने वाढली आहे. हे ३५५ मृत्यू, नाशिक -१०१, ठाणे-४०, पुणे-३५, सांगली-२२, औरंगाबाद-२१, उस्मानाबाद-२१, लातूर-१८, पालघर-१४, कोल्हापूर-१३, अहमदनगर-९, परभणी-९, नागपूर-७, सिंधुदुर्ग-७, रत्नागिरी-६, सोलापूर-५, अकोला-३, चंद्रपूर-३, सातारा-३, अमरावती-२, बीड-२, गडचिरोली-२, हिंगोली-२, जळगाव-२, रायगड-२, वर्धा-२, बुलढाणा-१, धुळे-१, जालना-१ आणि नंदूरबार-१ असे आहेत.


सीरम इंस्टीट्यूटकडून ‘Covishield’ नंतर आणखी एका लसीच्या निर्मितीला सुरूवात
First Published on: June 25, 2021 9:30 PM
Exit mobile version