तुमच्या शहरात शिवभोजन थाळी कोणत्या केंद्रावर? राज्यातील केंद्रांची यादी बघाच

तुमच्या शहरात शिवभोजन थाळी कोणत्या केंद्रावर? राज्यातील केंद्रांची यादी बघाच

तुमच्या शहरात शिवभोजन थाळी कोणत्या केंद्रावर? राज्यातील केंद्रांची यादी बघाच

कोरोनाची साखळी मोडण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीच्या काळात मजूर, कामगार, गोरगरीब यांच्या जेवणाचे हाल होऊ नये यासाठी राज्यात शिवभोजन योजनेतून एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. काल (१४ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू झाली. या कालावधीत मोफत शिवभोजन असताना काही ठिकाणी पैसे वसूल केले जात असल्याचं चित्र दिसलं. मोफत शिवभोजन थाळी देणार अशी घोषणा केल्यानंतर देखील पैसे का घेतले जात आहेत? याची माहिती घेतली असता मोफत शिवभोजन थाळीबद्दल काही केंद्रांना आदेश मिळाले नसल्याचं समोर आलं आहे.

लॉकडाऊन कालावधीत गरजू, गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. राज्यात ८९३ शिवभोजन केंद्र आहेत. अहमदनगर – २९, अकोला – १३, अमरावती – २३, औरंगाबाद – १८, बीड – २४, भंडारा – १३, बलढाणा – १७, चंद्रपुर – २२, धुळे – १५, गडचिरोली – १४, गोंदीया – १०, हिंगोली – ९, जळगाव – ३८, जालना – १५, कोल्हापूर – ३७, लातूर – २०, नागपूर – ३४, नांदेड – २२, नंदूरबार – १३, नाशिक – ४५, उस्मानाबाद – १२, पालघर – १३, परभणी – १२, पुणे – ९७ केंद्र आहेत.

मुंबईतील केंद्रे

१. अन्नपुर्णा कॅटरिंग सर्व्हिस – आर.एम. ओ. मेस कॅन्टीन, लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, सायन

थाळ्या – २००

२. सरस्वती महिला बचत गट – पालिका कामगार कॅन्टीन, तळमजला, एन वॉर्ड, पालिका इमारत, जवाहर रोड, घाटकोपर पूर्व

थाळ्या – २००

३. हर्षदा बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. – पंडीत मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय, गोवंडी पूर्व

थाळ्या – २००

४. हॉटेल अनिका – डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर नं. ०२, सायन पनवेल हायवे, मानखूर्द

थाळ्या – २००

५. नवजीवन रेस्टॉरंट – नवजीवन सोसायटीच्या बाजूला, सम्राट अशोक नगर, बादल बिजली को. ऑ.हौ.सो. जवळ, चेंबूर आर.सी.मार्ग

थाळ्या – २००

६. चेरीश फास्ट फुड सेंटर – युनिट नं. ५, तळमजला, ओंकार इंडस्ट्रियल प्रिमायसेस को.ऑप.सो.लि. रेल्वे स्टेशन रोड जवळ, कांजूरमार्ग

थाळ्या – २००

७. मनोरा चायनीज कॉर्नर – शॉप नं. १, बिल्डिंग क्र. १३८ समोर, अष्टविनायक मार्ग, नेहरुनगर, कुर्ला पूर्व

थाळ्या – २००

८. मुरारी भोजनालय – गाळा क्र. २-१,मुस्तफा मार्केट, खैरानी रोड, रहमानी हॉटेलच्या समोर, कुर्ला पश्चिम

थाळ्या – २००

९. अनुराधा किचन – शॉप नं. १, हकीम मेन्शन, एस.एम.रोड, टाकीया वॉर्ड, कुर्ला पश्चिम

थाळ्या – १००

१०. प्रथम महिला बचत गट – गाळा नं. १, इंडस्ट्रियल इस्टेट, आय. बी. पटेल रोड जवळ, अमर जवान चौक, गिरगाव पूर्व

थाळ्या – २००

११. वनिता कॅटरर्स – डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युन्सिपल हॉस्पिटल, तळमजला, एस. व्ही. रोड, कांदीवली पश्चिम

थाळ्या – १५०

१२. ओम साई स्नॅक्स कॉर्नर आणि कॅटरर्स – अॅडव्होकेट बार असोस्एशन, बोरिवली स्टेशन पश्चिम

थाळ्या – १५०

१३. हॉटेल आमंत्रण – लालचंद्र सिंह चाळ, कुरार पोलीस चौकीच्या समोर, आंबेवाडी, शांताराम तलाव, मालाड (पूर्व)

थाळ्या – २००

१४. जय भवानी बचत गट – ५/अ, तळमजला, किरण इंडस्ट्रियल इस्टेट, रामबाग, एम. जी. रोड, गोरेगाव (पश्चिम)

थाळ्या – २००

१५. स्नेहांकित महिला बचत गट – शॉप नं. २, बाबा विश्वनाथ चाळ, आकुर्ली रोड, गोकुळनगर, कांदिवली पूर्व

थाळ्या – १५०

१६. काशी हरी हॉटेल – शॉप नं. ८, नवशक्ती वेल्फेअर सोसायटी, अंकुर बिल्डिंग जवळ, लिंक रोड, गोरेगाव पश्चिम

थाळ्या – १५०

१७. क्रेव दि मल्टी क्युजीन (सदगुरु रेस्टॉरंट) प्लॉट नं. ३२६ (१ ते ४), जैनम अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, गोरेगाव पश्चिम

थाळ्या – २००

१८. जय सदगुरु महिला सेवा सहकारी संस्था मर्या. – ६७/५२६, मोतीलाल नगर नं. ३, मिलन मेडीकल जवळ, गोरेगाव पश्चिम

थाळ्या – २००

१९. शिवप्रभा सेवा सहकारी संस्था मर्या. – शॉप नं. बी.आर. सी २४, सेक्टर १, सह्याद्री पोलीस चौकी जवळ, चारकोप, कांदीवली पश्चिम

थाळ्या – २००

२०. सावित्रीबाई फूले महिला बचत गट – जनसेवा समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, न्यु लिंक रोड, गांधीनगर, कांदिवली पश्चिम

थाळ्या – २००

२१. सत्कार कॅटरर्स – स्टाफ कॅन्टिन, नायर हॉस्पिटल, तळमजला, मुंबई सेट्रल

थाळ्या – २००

२२. युवाभरारी महिला बचत गट – बी – १६५, प्रेमनगर, धारावी डेपो रोड, धारावी

थाळ्या – २००

२३. राहुल कॅटरिंग सर्व्हिसेस – जी. टी. हॉस्पिटल चतुर्थ श्रेणी क्रमचारी उपहारगृह, एल. टी मार्ग पोलीस स्टेशन समोर

थाळ्या – १५०

२४. शिवसिंधू फाऊंडेशन – ९/८६, न्यु. म्युनिसिपल चाळ, धारावी क्रॉस रोड, धारावी

थाळ्या – १००

२५. दौलत फाऊंडेशन (कॅफे अंबर) – गोपीनाथ कॉलनी नं. १, उज्वला मेडीकल जवळ, ९० फिट रोड, धारावी

थाळ्या – १००

२६. मनोहर उपहारगृह – शॉप नं. ५, हीराबाई पेटीट बिल्डिंग, अतिभाई प्रेमजी मार्ग, ग्रुटरोड रेल्वे स्टेशन समोर

थाळ्या – १००

नगरमध्ये मोफत ‘शिवभोजन’च्या थाळ्या वाढविण्याची वेळ

संचारबंदीच्या नियमांमुळे लोक तिथपर्यंत पोहचू शकतील का, अशी शंका व्यक्त केली जात असतानाच नगरमध्ये मात्र याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वेळेआधीच निर्धारित थाळ्या संपल्याने संख्या वाढवून देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी काही केंद्रांवर थाळ्या संपल्याने पार्सल घेऊन जाण्यासाठी आलेल्या अनेकांना परत जावे लागले. नगर जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर या थाळीला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात २९ केंद्रांवरून थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्यांची क्षमता साडेतीन हजार थाळी प्रतिदिन अशी आहे. वेगवेगळ्या भागातील केंद्रांना वेगवेगळी क्षमता ठरवून देण्यात आलेली आहे. आज निर्बंधाच्या पहिल्याच दिवशी बहुतांश केंद्रांवरील थाळ्या दुपारी लवकरच संपल्या. त्यामुळे जिल्ह्यासाठी आणखी ८०० थाळ्या वाढवून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे.

परभणीतील शिवभोजन केंद्रामुळे मिळतंय दोन वेळचं जेवण

परभणीतील शिवभोजन केंद्रामुळे गरजूंना दोन वेळचं जेवण मिळत आहे. परभणी शहरात तीन तर तालुक्यांमध्ये नऊ असे एकूण १२ केंद्रे जिल्ह्यात सध्या सुरु आहेत.

 

First Published on: April 15, 2021 6:10 PM
Exit mobile version