Maharashtra FYJC Admission 2021 : अकरावी प्रवेशाची पहिली यादी नव्वदी पार

Maharashtra FYJC Admission 2021 : अकरावी प्रवेशाची पहिली यादी नव्वदी पार

मुंबई महानगर क्षेत्रातील ११वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी सकाळी १० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आली. पहिल्या गुणवत्ता यादीत १ लाख ९१ हजार ९३ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना जागा अलॉटमेंट झाल्या. यामध्येही नामांकित महाविद्यालयातील पहिली कट ऑफ ही ८६ ते ९५ टक्क्यांच्यावरच राहिली. दहावीचा निकाल यंदा वाढला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत अनेक नामांकित महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये केवळ एक ते दोन टक्क्यांनी वाढ झाली.

अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागात अर्ज केलेल्या २ लाख २ हजार ३१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या यादीत १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना अलोटमेंट देण्यात आले. यामध्ये ५६ हजार ६१३ मुले तर ६१ हजार २६९ मुली आहेत. मुलांचे प्रमाण ५६.७१ टक्के तर मुलींचे प्रमाण ६७.१३ टक्के इतके आहे. पहिल्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४८ हजार ७८८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तर १८ हजार ८०४  विद्यार्थ्यांना दुसर्‍या आणि १२ हजार ७९९ विद्यार्थ्यांना तिसर्‍या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

यंदा गुणवंताची संख्या अधिक असल्याने नामांकित महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक होता. त्यामुळे ८८ ते ८५ टक्के गुण मिळूनही बहुतांश विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही. त्यामुळे पसंतीच्या महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांना पुढील यादीत संधी उपलब्ध आहे. पहिल्या यादीत एसएससी बोर्डाच्या तब्बल १ लाख ५ हजार ८६८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. तर आयसीएसईच्या ७ हजार १६७ विद्यार्थी, सीबीएसई मंडळाच्या ३ हजार ८१० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. तसेच वाणिज्य शाखेत सर्वाधिक ६५ हजार २८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.

त्याखालोखाल विज्ञान शाखेत ४० हजार ३५४ तर कला शाखेसाठी ११ हजार ७६८ विद्यार्थ्याना प्रवेश मिळाले. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या २ ते १० पसंतीक्रम असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय अलोट झाले असल्यास त्या विद्यार्थ्यास प्रवेश निश्चित दिलेल्या कालावधीत आपले पसंतीक्रम बदलून त्याची प्रिंट काढून ठेवावी. व ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलवायचे नसतील त्याचे पूर्वीचेच पसंतीक्रम ग्राह्य धरून अलोटमेंट करण्यात येणार आहे.

 

मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ 

एच आर कॉलेज 
कॉमर्स -93.4 टक्के

के सी कॉलेज
आर्टस् – 88.2 टक्के
कॉमर्स -91.4 टक्के
सायन्स – 90 टक्के

जय हिंद कॉलेज
आर्टस् – 91.6 टक्के
कॉमर्स – 92 टक्के
सायन्स – 89 टक्के

रुईया कॉलेज
आर्टस् – 93 टक्के
सायन्स – 93.4 टक्के

रुपारेल कॉलेज
आर्टस् – 88 टक्के
कॉमर्स -90.4 टक्के
सायन्स – 91.6टक्के

मिठीबाई कॉलेज
आर्टस् – 89.6 टक्के
कॉमर्स -91.6टक्के
सायन्स – 90 टक्के

वझे केळकर कॉलेज
आर्टस् – 89 टक्के
कॉमर्स -91.8 टक्के
सायन्स – 93.6 टक्के

झेवीयर्स कॉलेज
आर्टस् – 95.2 टक्के
सायन्स – 92.8 टक्के

एन एम कॉलेज
कॉमर्स -94 टक्के

पोदार कॉलेज 
कॉमर्स – 92.8 टक्के


हेही वाचा – Mumbai University Admissions 2021: महाविद्यालयीन प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर, कट ऑफ तीन टक्क्यांनी खाली

First Published on: August 27, 2021 8:39 PM
Exit mobile version