राज्यातील खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपातीचा शासन निर्णय जारी

राज्यातील खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपातीचा शासन निर्णय जारी

राज्यातील खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपातीचा शासन निर्णय जारी

खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील खासगी शाळांमधील १५ टक्के फी कपात करण्यात आली आहे. १५ टक्के फी कपात या शैक्षणिक वर्षासाठी लागू असणार आहे. त्याचप्रमाणे शाळांनी जर या वर्षीची जास्त फी घेतली असेल तर त्यांना त्यातील १५ टक्के रक्कम पालकांना परत करावी लागणार आहे किंवा पुढील शैक्षणिक वर्षात तेवढे पैसे कमी करावे लागणार आहेत. त्यामुळे आता पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Government issue gr to reduce private school fees by 15%)

विद्यार्थ्यांची १५ टक्के फी कपात व्हावी यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चा सुरू होती. याविषयीचा शासन निर्णय काढवा अशी मागणी अनेक संस्थाकडून करण्यात येत होती. शेवटी आज राज्य सरकारने शाळांच्या १५ टक्के फी कपातीचा शासन निर्णय काढला. राज्य सरकारने काही दिवसांपर्वीच खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात  करण्याचा निर्णय घेतला होता मात्र  त्याचा शासन निर्णय काढणे बाकी होते. अखेर आज राज्य शासनाच्या या निर्णयाचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

राजस्थानप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात करावी त्याचप्रमाणे कोरोना काळात विद्यार्थी घरी होते त्यामुळे फी वाढ रद्द करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतर खासगी शाळांच्या फी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अधिसूचना लवकरचं काढण्यात येतील असे देखील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला राज्यातील खासगी शाळांच्या फी कपतीचा निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ३ आठवड्यांमध्ये या निर्णयाचे आदेश द्यावेत असे सांगण्यात आले होता. त्यानुसार आता फी कपातीचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – पवारांचा हुबेहूब आवाजाला वापरले एप, अखेर पोलिसांना सापडलाच

First Published on: August 12, 2021 9:20 PM
Exit mobile version