मोठी बातमी: राज्यात ३० नोव्हेंबर पर्यंत लॉकडाऊन कायम

मोठी बातमी: राज्यात ३० नोव्हेंबर पर्यंत लॉकडाऊन कायम

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे थैमान शांत झाले आहे, तरिही खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केल्याप्रमाणे १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनचा सहावा टप्पा सुरु असेल, असे सांगण्यात येत आहे. तरिही सरकारने ज्या सवलती दिल्या आहेत, त्या नियम पाळून सुरुच राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनचे सर्व नियम जैसे थे राहणार आहेत.

राज्यात मिशन बिगिन अंतर्गत अनेक बाबींना परवानगी देण्यात आलेल्या आहेत. हॉटेल्स, बार आणि जिमला देखील परवानगी देण्यात आलेली आहे. हॉटेल्स रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. जिमला देखील बऱ्याच दिवसांनी परवानगी दिली. फक्त मंदिरे अजूनही खुली करण्यात आलेली नाहीत. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी येत असल्यामुळे या काळात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे.

 

 

First Published on: October 29, 2020 7:25 PM
Exit mobile version