राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल; 608 पैकी 51 ग्रामपंचायती बिनविरोध

राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल; 608 पैकी 51 ग्रामपंचायती बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता बदलानंतर झालेल्या पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालाची सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल मतदान पार पडले. यावेळी सरासरी 76 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

या एकूण 608 ग्रामपंचायतींपैकी 51 ग्रामपंचायतींमधील निवडणूक बिनविरोधात झाली. त्यामुळे सर्वांचे लक्ष हे उर्वरित 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुक निकालांकडे आहे. या मतांची मोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर निकाल जाहीर होतील. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यात काल सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडले. यात पहिल्यांदाच थेट जनतेमधून सरपंच निवडला जाणार असल्याने ही निवडणूक वेगळी ठरली. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी रविवारी विविध जिल्ह्यांमध्ये अगदी शांततेत मतदान पार पडले. त्यामुळे आज येणाऱ्या निकालानंतर विजयी उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

16 जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली याची जिल्हा आणि तालुकानिहाय संख्या

नंदुरबार

शहादा- 74

नंदुरबार- 75

धुळे

शिरपूर- 33

जळगाव

चोपडा- 11 आणि यावल- 02

बुलढाणा

जळगाव (जामोद)- 01

संग्रामपूर- 01

नांदुरा- 01

चिखली- 03

लोणार- 02

अकोला

अकोट- 07

बाळापूर- 01

वाशीम

कारंजा- 04

अमरावती

धारणी- 01

तिवसा- 04

अमरावती- 01

चांदुर रेल्वे- 01

यवतमाळ

बाभुळगाव- 02, कळंब- 02,

यवतमाळ- 03, महागाव- 01,

आर्णी- 04, घाटंजी- 06,

केळापूर- 25, राळेगाव- 11,

मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08

नांदेड

माहूर- 24, किनवट- 47,

अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04,

लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01

हिंगोली

(औंढा नागनाथ)- 06.

परभणी

जिंतूर- 01

पालम- 04

नाशिक

कळवण- 22,

दिंडोरी- 50

नाशिक- 17

पुणे

जुन्नर- 38,

आंबेगाव- 18

खेड- 05

भोर- 02

अहमदनगर

अकोले- 45

लातूर

अहमदपूर- 01

सातारा

वाई- 01

सातारा- 08

कोल्हापूर
कागल- 01

काल एकूण 608 ग्रामपंचायतींपैकी 547 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.


भारत माझा देश आहे, पण कधी कधी…?

First Published on: September 19, 2022 8:08 AM
Exit mobile version