ट्विटरमुळे पेटला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा वणवा, ‘त्या’ फेक ट्वीटचा घोळ काय?

ट्विटरमुळे पेटला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा वणवा, ‘त्या’ फेक ट्वीटचा घोळ काय?

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात सीमावादाचा तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कर्नाटकच्या सरकारकडून अनेक प्रकारचे आरोप महाराष्ट्र सरकारवर केले जात आहेत. परंतु मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून ट्वीटरवरुन विविध प्रकारची प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. परंतु फेक ट्वीटमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा वणवा पेटवल्याचा आरोप केला जातोय. मात्र, या फेक ट्वीटचा घोळ नेमका काय आहे. याची स्पष्टता अद्यापही समोर आलेली नाही.

सीमवाद प्रश्नावर दिल्लीत काल महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांनी आमने सामने बसवलं. काही उपायही सुचवले. पण या बैठकीनंतर या तणावाचं खापर सर्वाधिक कुठल्या गोष्टीवर फुटलं असेल तर ते एका ट्विटरवर. फेक ट्वीटचा मुद्दा या बैठकीत गाजला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाने एका फिरणाऱ्या ट्वीटवर महाराष्ट्रासंबंधी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. हा मुद्दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर ते अकाउंट आपलं नव्हतं अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली. यासंबंधी तपास करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

सांगलीतील जतमधील गावांविषयी बोलताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काही वक्तव्यं केली. त्यानंतर त्याला उत्तरं देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वक्तव्य केलं. नंतर त्यावर दोन्ही बाजूकडील राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया सुरू झाल्या आणि तणाव वाढला. कर्नाटक्या मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटमध्ये आक्रमक भाषा दिसली. तसेच ते ट्वीट अद्यापही हटवण्यात आलेले नाहीये. बी एस बोम्मई या नावानं ब्लू टिक असलेल्या व्हेरिफाईड हँडलवरच हे ट्वूट अजूनही कायम आहे. त्यामुळे फेक ट्विटचा हा आरोप नेमका कुणावर आहे. हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये.


हेही वाचा : महाविकास आघाडी सरकारचा विराट मोर्चा अद्याप पोलीस परवानगीच्या प्रतीक्षेत; पुढील रणनीती काय


 

First Published on: December 15, 2022 4:31 PM
Exit mobile version