घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकारचा विराट मोर्चा अद्याप पोलीस परवानगीच्या प्रतीक्षेत; पुढील रणनीती काय?

महाविकास आघाडी सरकारचा विराट मोर्चा अद्याप पोलीस परवानगीच्या प्रतीक्षेत; पुढील रणनीती काय?

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या अन्य नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्याच्या इतर मानबिंदूंवर करण्यात आलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधान आणि कर्नाटकविरोधातील राज्य सरकारची नेभळट भूमिका, राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेण्याचे कट कारस्थान तसेच वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नावर शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून 17 डिसेंबर रोजी मुंबईतून महामार्चा निघणार आहे. मुंबईतील या महामोर्चासाठी बैठका झाल्या, तयारी अंतिम टप्प्यात पोहचली, बसेस बुक झाल्या, मोर्चाचा मार्ग ठरला मात्र मुंबई पोलिसंनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिलेली नाही, त्यामुळे मविआच्या मोर्चासमोरील अडचणी वाढल्या आहेत. 17 डिसेंबर म्हणजे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या मोर्चाला मुंबई पोलिसांची परवानगी मिळणार की नाही याकडे मविआ नेत्यांच लक्ष आहे.

महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी सरकार हा विराट मोर्चा काढणार आहे. यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. या सर्व पक्षांचे कार्यकर्ते आता एक एक करुन मुंबईत दाखल होत आहे. यात तीन प्रमुख पक्षांनी एक – एक लाखांचे टार्गेट ठेवत तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट ठेवले आहे. सध्या या मोर्चात कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी योजना आखली जात आहे. पण एवढं सगळ सुरु असताना परवानगी न मिळाल्याने चिंता वाढली आहे.

- Advertisement -

17 डिसेंबरला सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने येणार आहे. याठिकाणी पोहचल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या समोरील एका ट्रकवर जाहीर सभा होईल. यावेळी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील, तर काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप यांच्यासह इतर वरिष्ठ नेते तसेच राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि इतर कार्यकर्ते शिवाय मित्र पक्षांतील नेते उपस्थित राहणार आहे. यासोबत काही सामाजिक संघटना देखील या मोर्चात सहभागी होती.


देशातील तरुणाईला नशेच्या आहारी घालवण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र; नाना पटोलेंचा घणाघात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -