Maharashtra lockdown 2021: लॉकडाऊनची बुधवारी घोषणा? मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

Maharashtra lockdown 2021: लॉकडाऊनची बुधवारी घोषणा? मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : सेवेदरम्यान अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला नोकरी

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, बुधवारी यासंदर्भातील घोषणा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या घोषणेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. लॉकडाऊन किती दिवसांचा जाहीर करायचा, कोणत्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या, सार्वजनिक वाहतुकीबाबत काय करायचे, गेल्या वर्षीप्रमाणे जिल्हा बंदी लागू करायची किंवा कसे? याबाबत आज रात्री चर्चा होऊन मार्गदर्शक सूचना जारी होणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, ऑक्सिजनची कमतरता आणि औषधांचा तुटवडा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने गेल्या वर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत झाली. या मागणीला उद्धव ठाकरे यांनी अनुकूलता दाखवली.

लॉकडाऊन लागू करताना कोणत्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या, कोणत्या बंद करायच्या याबाबत उद्या निर्णय होईल. उद्याच्या निर्णयानुसार मार्गदर्शक सूचना जारी झाल्यानंतर आजच्या सूचना रद्द होतील, असे परब यांनी सांगितले.

तर कठोर निर्बंध, विकेंड लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी लागू करूनही रुग्णसंख्या वाढत असल्याने महाराष्ट्रात काही तासात लॉकडाऊन जाहीर होऊ शकेल, असे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बैठकीनंतर सांगितले. परदेशी लस खरेदीसाठी केंद्राला मागणी करणार राज्यातील लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला परदेशातून कोरोना प्रतिबंधित लस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारे परवानगी द्यावी अशी मागणी मंत्रिमंडळात झाली. सर्व मंत्री एकमताने केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.

First Published on: April 20, 2021 8:12 PM
Exit mobile version