Maharashtra Lockdown 2021: राज्यातील लॉकडाऊन वाढणार, विजय वडेट्टीवार यांचे संकेत

Maharashtra Lockdown 2021: राज्यातील लॉकडाऊन वाढणार, विजय वडेट्टीवार यांचे संकेत

राज्यात १ मे पर्यत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या घटत असली तरी राज्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यावर निर्णय होणार असल्याचे विजय वड्डेटीवार यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊननंतर मुंबई, ठाण्यात रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र विदर्भ, मराठावाडा आणि बाकीच्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी होतानाची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे राज्यतील लॉकडाऊन वाढविण्याविषयी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट संकेत मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिले आहेत.

१ मे रोजी राज्यातील लॉकडाऊन संपेल अशा आशेवर राज्यातील नागरिक होते. मात्र विदर्भ, मराठवाड्यातील परिस्थितीकडे आता लक्ष न दिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. मुंबई ठाणे, पुणे भागात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या घटली आहे. मात्र राज्यातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत बिकट अवस्थेत आहे.

राज्यात २२ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन सुरु करण्यात आलाय. २२ एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यास लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: ऑगस्ट अखेरीपर्यंत संपुर्ण मुंबईकरांच्या लसीकरणास पालिका सज्ज, लसींचा पुरवठा होणे गरजेचे – महापौर

 

First Published on: April 27, 2021 2:34 PM
Exit mobile version