घरCORONA UPDATECorona Vaccination: ऑगस्ट अखेरीपर्यंत संपुर्ण मुंबईकरांच्या लसीकरणास पालिका सज्ज, लसींचा पुरवठा होणे...

Corona Vaccination: ऑगस्ट अखेरीपर्यंत संपुर्ण मुंबईकरांच्या लसीकरणास पालिका सज्ज, लसींचा पुरवठा होणे गरजेचे – महापौर

Subscribe

१ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या मार्गदर्शक सूचना लवकरच कळवू - महापौर

मुंबईसह राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे लसीचा योग्य मुबलक पुरवठा होणे महत्त्वाचे आहे. १ मे पासून मुंबईत लसीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे मात्र लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे ऑगस्ट २०२१ पर्यत मुंबईत लसीकरण  पूर्ण करायचे ध्येय आहे त्यासाठी पालिका पूर्ण सज्ज आहे मात्र त्यासाठी लससाठा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या मार्गदर्शक सूचना लवकरच कळवू असे महापौरांनी सांगितले. १ मे पासून सुरु होणारे लसीकरण कसे असेल याविषयी महापौरांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.

१ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी २२५ नवीन लसीकरण केंद्र सुरु केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र तयार केले जाऊ शकते,असेही त्या म्हणाल्या. १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करताना तीन टप्प्यात लसीकरण करावे लागेल. ६० वर्षांवरील नागरिकांचा वेगळा गट, ज्यांचा लसीचा २ डोस सुरु आहे त्यांचा वेगळा गट आणि १८ ते ४५ वर्षांतील नागरिकांचा वेगळा गट तयार करावे लागले. प्रत्येकाला नोंदणी करुनच लस दिली जाईल. त्याचप्रमाणे राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थिती आपल्याला लोकांना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणायचे नाहीय मात्र त्यांना लवकरात लवकर कोरोनामुक्त करायचे आहे. त्यामुळे नागरिकांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन महापौरांनी केले.

- Advertisement -

नोंदणी न करता लसीकरण केंद्रावर जाऊ नका. लसीकरणासाठी आधी कोविन अँपवर नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाच्या दिवशी लसीकरण केद्रांवर उगाच गर्दी करु नका. तुमची लस आली आहे का हे एकदा कोविन अँपवर चेक करुनच लस घेण्यासाठी घराबाहेर पडा, असे आवाहन महापौर किशोरी पडणेकर यांनी नागरिकांना केले आहे.

कोरोना लसीकरणासाठी सर्व तयारी वेळेत होईल फक्त लसीचा साठा मिळणे गरजेचे आहे. योग्य लसीचा साठा मिळाल्यास ऑगस्ट महिन्यात मुंबईचे लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय आहे. लसी संदर्भात लोकांनी जनजागृती करा. लस उलब्धतेचे फलक लावा. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त माहिती द्या, असे महापौरांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: मुंबईकरांचा लसीकरणाला प्रतिसाद, काल ६९ हजार ५७७ मुंबईकारांनी घेतली लस

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -