Maharashtra Lockdown 2021: कोल्हापूरात लॉकडाऊनला हरताळ, पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका

Maharashtra Lockdown 2021: कोल्हापूरात लॉकडाऊनला हरताळ, पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका

Maharashtra Lockdown 2021: कोल्हापूरात लॉकडाऊनला हरताळ, पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका

राज्यात गुरुवारपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. मात्र तरीही लॉकडाऊनला धाब्यावर बसवल्याचे चित्र कोल्हापूरात पहायला मिळत आहे. कोल्हापूरात लॉकडाऊन नाहीच अशी परिस्थिती आहे. राज्यात लॉकडाऊन असतानाही कोल्हापूरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या धार्मिका कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. कोरोनाच्या सर्व नियमांची पायमल्ली करत कोल्हापूरात मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम पार पाडले जात आहेत. भाविकांच्या प्रचंड गर्दीत मात्र पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतल्याचे समोर आले.

कोल्हापूरातील करवीर तालुक्यातील येवती गावात लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या सर्व नियमांना हरताळ फासत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले गावकरी इकत्र आले होते. त्यातील कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हते. कोल्हापूरातील पोलिसांनीही याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. सुरु असलेल्या कार्यक्रमात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेनचे सर्व नियम आळखी कडक करण्यात आले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र तरीही नागरिक नियमांचा फज्ज उडवून अशाप्रकारचे कार्यक्रम करत आहेत. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येचा दिवसेंदिवस विस्फोट होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.


हेही वाचा – Maharashtra Lockdown: राज्यातील कडक लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद कसा? मुंबई, ठाणे, पुण्यातील स्थिती काय?

First Published on: April 23, 2021 4:56 PM
Exit mobile version