घरताज्या घडामोडीMaharashtra Lockdown: राज्यातील कडक लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद कसा? मुंबई, ठाणे, पुण्यातील स्थिती...

Maharashtra Lockdown: राज्यातील कडक लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद कसा? मुंबई, ठाणे, पुण्यातील स्थिती काय?

Subscribe

नालासोपा आणि विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिक बेजबाबदारपणे फिरत असल्यामुळे राज्य सरकारने १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. २२ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासुन ब्रेक द चेनमध्ये अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी केले आहेत. या लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आजपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह सर्वच जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु तरिही काही ठिकाणी तुरळक गर्दी पाहायला मिळाली आहे.

मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात शुकशुकाट

मुंबई नेहमी गर्दीने गजबजलेले शहर असे ओळखले जाते. राज्य सरकारने केलेल्या कडक लॉकडाऊनचा मुंबईत चांगला परिणाम दिसला आहे. मुंबईतील मरिन ड्राईव्ह, सीएसमएटी, चर्चगेट या स्थानकांवर गर्दी कमी प्रमाणात पाहायाला मिळाली आहे. कुर्ला बस स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळाला आहे. रेल्वे प्रवास फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना असल्यामुळे फक्त अत्यवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची तुरळक गर्दी रेल्वे स्थानकात पाहायला होती. दादर भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. भाजी मार्केटमध्ये सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली यानंतर पोलिसांनी भाजी विक्रेत्यांना ६ फुटाचे अंतर ठेवून बसण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत सर्व ठिकाणी पोलीसांकडून लॉऊडस्पीकर लावून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

ठाण्यात बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी

ठाण्यात कडक लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. बसमध्ये ५० टक्के वाहतूक आणि रेल्वे प्रवास अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. मुबंई ठिकाणी कामाला जाणाऱ्या कामगारांचा मोर्चा रेल्वे बंद असल्यामुळे बस वाहतुकीकडे वळला त्यामुळे ठाण्यातील बस स्थानाकांवर नागिरकांची गर्दी पाहायला मिळाली, ठाणे रेल्वे स्थानकात ओळखपत्र तपासून पोलीस आत सोडत आहेत. तसेच कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ठाण्यातील पडघा टोलनाक्यावर वाहनांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली तर मुलूंड टोल नाक्यावर अल्प प्रमाणात वाहनांची वर्दळ होती. नवी मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये कामगारांची आणि व्यावसायिकांची गर्दी झाल्यामुळे कोरोना नियमांचा फज्जा उडाला होता.

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर तुरळक वाहनांची गर्दी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन दररोज हजारो गाड्यांची ये-जा होत असते. आज लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी महामार्गावर तुरळक वाहनांची गर्दी पाहायला मिळाली. पुण्यात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद पाहायला मिळालाय परंतु परराज्यात जाणाऱ्या कामगारांची रेल्वे स्थानकात गर्दी पाहायला मिळाली आहे. पुण्यातील भाजी मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाले आहे. पुण्यातील बस स्थानकात प्रवाशांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली आहे.

- Advertisement -

नालासोपा आणि विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी

नेहमी गर्दी असलेल्या नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकांवर लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आहे. नालासोपारा विरार येथून मुंबईला मोठा कामगार वर्ग कामाला येत असतो. अत्यावश्य सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाला परवानागी असतानाही या स्थानकांवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नालासोपारामध्ये लॉकडाऊनच्या नियमांना पायदळी तुडवण्यात आले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -