राज्यात १२-१३ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता – हसन मुश्रीफ

राज्यात १२-१३ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता – हसन मुश्रीफ

एक रुपयात १० सॅनिटरी नॅपकिन ,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मात्र, हा लॉकडाऊन किती दिवसाचा असेल, याबाबत स्पष्टता नाही. राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी लॉकडाऊन १२ ते १३ दिवसांचा असू शकतो, अशी माहिती दिली. यावेळी हसन मुश्रीफ यांनी परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नये, सरकार तुमची काळजी घेईल, असं आवाहन केलं आहे. हसन मुश्रीफ मंगळवारी कोल्हापुरात आहेत. यावेळी ते बोलत होते.

लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात जात आहेत. या कामगारांना गाव न जाण्याचं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं. त्यांनी लॉकडाऊनच्या भीतीने गावी परतत असलेल्या परप्रांतीय कामगारांना महाराष्ट्रातच थांबण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकार तुमची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं.

लॉकडाऊनचा निर्णय आज होणार?

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. कुणाशी चर्चा न करता लॉकडाऊन लावण्याची केंद्रानं केलेली चूक आम्ही करणार नाही, असं देखील अस्लम शेख म्हणाले. रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अधिक वेळ दवडण्यात अर्थ नसल्याचं सरकारचं मत बनलं आहे. त्यामुळं संपूर्ण लॉकडाउनची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे, असं अस्लम शेख म्हणाले.


हेही वाचा –  मुख्यमंत्री आजच लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची शक्यता – अस्लम शेख


 

First Published on: April 13, 2021 3:22 PM
Exit mobile version