Maharashtra Lockdown: राज्यात कडक निर्बंध काय सुरु, काय बंद? जाणून घ्या

Maharashtra Lockdown: राज्यात कडक निर्बंध काय सुरु, काय बंद? जाणून घ्या

Maharashtra Lockdown: राज्यात कडक निर्बंध काय सुरु, काय बंद? जाणून घ्या

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्यापासून(बुधवार) कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी ही भयावह आहे. ही परिस्थिती चांगली नाही आहे परंतु घाबरुन जाण्याचे कारण नाही. कोरोनाची साखळी जर तुटली नाही तर ही साखळी आपल्याला गुरफटुन घेल त्यासाठी राज्यात काही कडक निर्बंध लागू केले पाहिजेत. निर्बंध घालतो परंतु पर्याय नाही, पण काही निर्बंध तसेच आहेत साखळी तुटायला हवी, रोजीरोटी महत्त्वाची आहेच त्यासोबत जीवही वाचवायला हवेत. आजपर्यंत जे निर्बंध टाकले ते वाढवण्यात येत आहे. उद्या १४ एप्रिलपासून रात्री ८ पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होतेय तिथे सूट असेल मतदान झाल्यानंतर तिथेही कडक निर्बंध लागू करण्यात येतील. राज्यात लागू केलेल्या निर्बंधाला सकार्य करा आणि सगळ्यांनी सैनिक बनून कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

उद्या(बुधवार) संध्याकाळपासून राज्यात राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहेत. पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई आहे. नागरिकांचे अनावश्यक येणे जाणे पूर्ण बंद राहणार आहे. आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील

सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु राहील

औषधे, लस उत्पादक, अत्यावश्यक सेवा देणारे, मास्क वितरक, वैद्यकीय लोक, जनावरेंशी संबंधित दवाखाने उघडी राहतील

पेट्रोल पंप सुरु राहतील

बांधकामं जिथे सुरु असेल तिथेच कर्मचाऱ्यांची राहण्याची सुविधा करा. त्यांना वाहतूक करु देऊ नका.

थोडी वाहतूक सुरु ठेवत असाल तर बांधकाम उद्योग चालू ठेवू शकता.

हॉटेल रेस्टॉरंटवर पूर्वीप्रमाणे निर्बंध, होम डिलिव्हरी सुरु

पत्रकारांनाही सूट असेल.

रस्त्यावरील खाद्यपदार्थांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहील मात्र गर्दी होता कामा नये

उद्या रात्री ८ पासून राज्यात १५ दिवस संचारबंदी असेल

कडक निर्बध उद्या ८ वाजतापासून लागू असणार

अति व आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

सकाळी ७ ते रात्री ८ च्या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

लोकल, बससेवा अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीच असेल

हॉस्पिटल, औषधी कंपन्या, लस उत्पादक, जंतूनाशक वितरकासाठी सूट

बँक, दूरसंचार सेवा, शीतगृह, रेल्चे, बस आणि ऑटो सुरु राहतील

हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार होम डिलिव्हरी सुरु

७ कोटी गरीब लोकांना १ महिना मदत ३ किलो गहू, २ किलो तांदूळ

First Published on: April 13, 2021 9:39 PM
Exit mobile version