‘तू इधर उधर की बात न कर’; प्रसाद लाड यांचा तुफान शेरोशायरीत मविआवर हल्लाबोल

‘तू इधर उधर की बात न कर’; प्रसाद लाड यांचा तुफान शेरोशायरीत मविआवर हल्लाबोल

राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. पायऱ्यांवरील घोषणाबाजी, आंदोलनावरून हे अधिवेशन तुफान गाजले. यात दोन्ही सभागृहामध्येही विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी तुफान शेरोशायरी करत भाजप नेत्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. ठाकरेंचे पुत्र म्हणून उद्धव ठाकरे  म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो, अशा शब्दात त्यांनी ठाकरे कुटुंबियांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100 टक्के असतो, कंबोज हे पेपर, पुरावे असल्याशिवाय बोलत नाही, असा देखील इशारा यावेळी प्रसाद लाड यांनी दिला.

प्रसाद लाड सभागृहात बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरेंसोबत राजकीय वाद असू शकतात, त्यांच्यावर आम्ही राजकीय बोलू शकतो. मात्र ठाकरेंचे पुत्र म्हणून उद्धव ठाकरे म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो. भाजपचा कोणता कार्यकर्ता ठाकरेंच्या घराव किंवा ठाकरेंवर हल्ला करण्याचा कधी प्रयत्न करणार नाही. असा म्हणत उद्धव ठाकरेंना खरा धाक हा भाजप आणि खऱ्या शिवसेनाचा बसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये पोलिसांचा गैरवापर झाल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकणारे आता कुठे गेले? दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कोण गेलं? असे सवाल उपस्थित केले.

“कंबोज यांनी ट्विट केल्यावर कार्यक्रम होतो”

मोहित कंबोज यांच्या ट्विटवर बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, मोहित कंबोजवरील हल्ल्याचं काय झालं? आत्तापर्यंत आरोपी का पकडले गेले नाहीत? अडीच वर्षांच्या काळात सरकारने अनेक वचननामे दिले. मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100 टक्के आहे, ट्विट केल्यावर कार्यक्रम होतो. कंबोज हे पेपर, पुरावे, कागदपत्रांशिवाय बोलत नाही, असा देखील इशारा यावेळी प्रसाद लाड यांनी दिला.

याशिवाय प्रसाद लाड यांनी शेवटी शेरोशायरी करत सभागृहात एका माहोल तयार केला. तू इधर उधर की बात न कर, ये बता की काफिला क्यो लुटा, मुझे रहजोनोसे गिला नही, तेरे रहबरीका ये सवाल है. अशी शायरी प्रसाद लाड यांनी म्हटली.


बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात ‘मनरेगा’च्या कालावधीत वाढ करावी, अजित पवारांची मागणी

First Published on: August 25, 2022 4:11 PM
Exit mobile version