…तेव्हा दोन वेळचं जेवण तुम्ही देत होता का? अमोल कोल्हेंचा गौतमी पाटीलला पाठिंबा

…तेव्हा दोन वेळचं जेवण तुम्ही देत होता का? अमोल कोल्हेंचा गौतमी पाटीलला पाठिंबा

Maharashtra news you serving meals to her Amol Kolhe supports Gautami Patil

महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या संदर्भात विविध वाद निर्माण केले जात आहेत. कधी तिच्या मानधनावरुन तर कधी तिच्या आडनावावरुन तर कधी तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जाते. यावर अनेक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी गौतमी पाटीलला आपला पाठिंबा दर्शवला आहे.( Maharashtra news you serving meals to her Amol Kolhe supports Gautami Patil )

काय म्हणाले अमोल कोल्हे?

लावणी नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील हिची क्रेझ निर्माण झाली आहे. परंतु कला क्षेत्रामध्ये मिळत असलेले यश कधीच कायमस्वरुपी नसते. आज तिच्यासंदर्भात जे होत आहे, ते प्रत्येक कलाकारांच्या बाबतीत होतं असतं. आज गौतमी पाटील यशाच्या शिखरावर आहे. कलाकार म्हणून ती तिची कला सादर करत आहे. तो तिचा व्यवसाय आहे. यामुळे तिला अकारण ट्रोल करण्यापेक्षा तिची कुचंबणा होऊ नये, अशी काळजी घ्या, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केलं.

तेव्हा कोणी आलं होतं का?

अमोल कोल्हे म्हणाले की, सध्या तिच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होत आहे. मात्र जेव्हा तिची परिस्थिती हलाखीची होती, प्रतिकूल होती तेव्हा दोन वेळंचं जेवणं द्यायला कोणी गेलं नाही. आता ती तिच्या कर्तृत्त्वावर पुढे जात आहे. तेव्हा कोणाच्या पोटात दुखण्याची काय गरज? अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी गौतमीला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. यासोबतच त्यांनी शिरुर मतदारसंघतील महत्त्वाच्या प्रश्नांवरही आपलं मतं दिलं आहे.

( हेही वाचा: संभाजीराजेंचा U Turn; गौतमी पाटीलला दिलेला पाठिंबा घेतला मागे, म्हणाले अशी ‘कला’.. )

संभाजीराजेंनी पाठिंबा घेतला मागे 

संभाजीराजे  छत्रपती यांनी आधी गौतमी पाटीलला पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी ट्वीट करत म्हटले की काल एका पत्रकाराने एका महिलेचा “कलाकार” असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे. मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची कला मी पाहिली. आता असं वाटतं की, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा कलेला नको रे बाबा संरक्षम, असं ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

First Published on: May 30, 2023 5:30 PM
Exit mobile version