कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतोय, ४८ तासांत २७८ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतोय, ४८ तासांत २७८ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

राज्यात दिवसभरात २११ पोलिसांना कोरोनाची लागण

दिवसेंदिवस कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कोरोना योध्दांमध्ये होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांसाठी या संकटात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे.  मागील ४८ तासांत २७८ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात ७१ पोलिसांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर राज्यात १ हजार ११३ पोलीसांवर उपचार सुरू आहेत.

मागील २४ तासात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाचे आणखी १७ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या १६६ जवानांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २८२ जवानांची कोरोनातून मुक्तता झाली आहे.

कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांचे कोरोनापासून रक्षण व्हावे यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचे प्राण वाचवत आहेत. मात्र आता या योध्दां भोवतीच कोरोनाने आपलं जाळं विणायला सुरूवात केली आहे.


हे ही वाचा – अजय म्हणतो रोगप्रतिकारशक्ती वाढवणासाठी ‘हे’ घ्या औषध आणि झाला ट्रोल!


First Published on: July 8, 2020 8:01 PM
Exit mobile version