Maharashtra Politics : राजेश टोपे अजित पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Maharashtra Politics : राजेश टोपे अजित पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

राजेश टोपे अजित पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळे म्हणाल्या...

पुणे : पुण्यात आज (ता. 24 फेब्रुवारी) कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे, रोहित पवार हे उपस्थित होते. परंतु, त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार असलेले राजेश टोपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासकामांशी संबंधित बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, राजेश टोपे यांनी सकाळीच अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics : Rajesh Tope meets Ajit Pawar, Supriya Sule said…)

हेही वाचा… BJP VS NCP-SP : आता “तुतारी” वाजेल की…; भाजपाच्या ‘या’ नेत्याची खोचक टीका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक मोठ्या राजकीय हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी हा पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह दोन्ही गोष्टी अजित पवार यांना मिळाल्याने त्यांचा गट खरी राष्ट्रवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता शरद पवारांना पुन्हा नव्याने आपले साम्राज्य स्थापन करावे लागणार आहे. पण दुसरीकडे आता शरद पवारांना त्यांच्याकडे असलेले काही महत्त्वाचे नेते स्वतःकडे ठेवण्याचे मोठे काम असणार आहे. त्यामुळे अशातच शरद पवार गटाचे बडे नेते राजेश टोपे अजित पवार यांची भेट घेतल्याने ही भेट नेमकी कशासाठीहोती? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अजित पवार आणि राजेश टोपे यांची बैठक सर्कीट हाऊसमध्ये बंद दाराआड झाली. या चर्चेच्या दरम्यान अन्य कोणी उपस्थित नव्हते. राजेश टोपे अजित पवार यांना भेटून सर्किट हाऊस मधून निघाले. त्यानंतर राजेश टोपे यांना माध्यमांनी गाठले. त्यावेळी त्यांनी चर्चेचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला. त्यामुळे या बैठकीत या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबत कोणतेही स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही. तर याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने लोकांच्या कामासाठी आम्हाला मंत्र्यांची भेट घेणे, गरजेचेच असते.

तर, अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यंत्री आहेत. पुण्याचे पालकमंत्रीही ते आहेत. ते आता जरी वेगळ्या विचाराच्या सरकारमध्ये काम करत असले तरी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकांची कामे करण्यासाठी आम्हाला कोणाकडेही जायला काहीच वाटत नाही. दिल्लीतही माझे प्रत्येक मंत्र्यांसोबत चांगले वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे राजकारण एकीकडे आणि लोकांची कामे एकीकडे, असे सुप्रिया सुळे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. परंतु, आता राजेश टोपी यांनी घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

First Published on: February 24, 2024 9:14 AM
Exit mobile version