जळगाव: चाळीसगावात पावसाचा हाहा:कार, नागरिकांसह तब्बल ८०० जनावरं वाहून गेल्याची भीती

जळगाव: चाळीसगावात पावसाचा हाहा:कार, नागरिकांसह तब्बल ८०० जनावरं वाहून गेल्याची भीती

जळगाव: चाळीसगावात पावसाचा हाहा:कार, नागरिकांसह तब्बल ८०० जनावरं वाहून गेल्याची भीती

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे जळगाव आणि चाळीसगावामधील नदी- नाल्यांना अक्षरश: पूर आला आहे. चाळीसगावातील पुराच्या पाण्यात काही नागरिकांसह तब्बल ८०० जनावरं वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्य़ा चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावं, वाड्यावस्त्या पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत. या पुराच्या पाण्यात सात ते आठ नागरिक वाहून गेल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. चाळीसगावामधीसल पुरात मोठं नुकसान झाल्याची माहिती येथील स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

आज सकाळी ४ ते ७ वाजेच्या दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील बाटनादेवी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे डोंगरी नदीला आलेल्य़ा पुरामुळे जवळपास १५ गावांमध्ये पाणी शिरले. यातअनेक घरांचे मोठे नुकसान झाले तर ७ ते ८ नागरिक वाहून गेले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या हाती वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. अद्यापही अनेक गावांतील घरं पाण्य़ाखाली आहेत. अशी आमदार माहिती मंगेश चव्हाण यांनी दिली.

जळगावातील मुसळधार पावसामुळे अनेक घाट भागांत दरड कोसळ्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे मोठ्याप्रमाणात वाहनांच्य़ा रांगा लागल्या होत्या. वाढती वाहतूक कोंडी पाहता ही वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. नदीकाटच्या ८ ते १० खेड्यांमधील साधारणत: ७०० ते ८०० गुरं वाहून गेलीत तर काही दगावलीत. आत्तापर्यंत ३ ते ४ नागरिकांचे मृतदेह हाती आले आहेत. मात्र अजूनही ८ ते १० नागरिक या पुराच्या पाण्यात अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफची टीम धुळ्याहून जळगावला दाखल झाली आहे. मात्र अनेक गावांत मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगरी आणि इतूर नदीला पूर आल्याने वागळी, चाळीसगाव शहराच्या भागासह ८ ते १० शहरांना या पुराचा फटका बसला आहे. अशी माहिती मंगेश चव्हाण यांनी दिली.

कन्नड घाटात दरड कोसळली

राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचे बघायला मिळत आहे. मराठवाडयाला याचा सर्वाधिक फटका बसला होता. गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाने कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्गावर कन्नड घाटात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतूकीसाठी बंद आहे, तरी नागरिकांनी प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करु नये, औरंगाबादला जाण्यासाठी नांदगाव मार्गाचा वापर करावा, तसेच औरंगाबादहून येण्यासाठी जळगाव मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ढिगार्‍याखाली वाहने अडकली

दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, दरड कोसळल्यानंतरची दृश्य खूपच भयावह आहेत. ही दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच दरड कोसळल्याने ढिगार्‍याखाली अनेक गाड्या अडकल्याचे दिसत आहे. दरड कोसळली त्या ठिकाणी पोलीस पथक दाखल झाले असून दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. रात्रीपासून या मार्गावर वाहने अडकून पडल्याने नागरीकांना पाणी आणि जेवण मिळणेही मुश्किल झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.


Maharashtra Monsoon: महाराष्ट्रात पुढील ३-४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता


 

First Published on: August 31, 2021 1:21 PM
Exit mobile version