Maharashtra Corona Update: दिलासा! कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत घट; आज ९,७९८ नव्या रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update: दिलासा! कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत घट; आज ९,७९८ नव्या रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना पुन्हा फोफावतोय, २४ तासात १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येसह कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत देखील घट झाली आहे. गुरूवारी राज्यात ९ हजार ८३० जणांना कोरोनाची लागण झाली होती तर २३६ जणांचा मृत्यू झाला होता. तर आज शुक्रवारी ९ हजारांहून अधिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर गेल्या २४ तासात १९८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९०,७८,५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,५४,५०८ (१५.२४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५४,४६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज १४,३४७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

दरम्यान, आज १४ हजार ३४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,९९,९८३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७३ % एवढे झाले आहे.

राज्यातील मृत्यूदर १.९६% एवढा

आज नोंद झालेल्या एकूण १९८ मृत्यूंपैकी १३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४५० ने वाढली आहे. हे ४५० मृत्यू, नाशिक १२२, अहमदनगर १११, पुणे ५७, नागपूर ४९, जळगाव २०, ठाणे १७, भंडारा १६, उस्मानाबाद ११, सातारा ९, यवतमाळ ५, अकोला ४, औरंगाबाद ४, धुळे ४, बीड ३, बुलढाणा ३, चंद्रपूर ३, सांगली ३, लातूर २, वर्धा २, हिंगोली १, रत्नागिरी १, सिंधुदुर्ग १, सोलापूर १ आणि वाशिम १ असे आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६% एवढा आहे.

 

First Published on: June 18, 2021 8:58 PM
Exit mobile version