विजचोरांना रोखण्यासाठी महावितरण मंडळाने लढवली नवी शक्कल

विजचोरांना रोखण्यासाठी महावितरण मंडळाने लढवली नवी शक्कल

वीजचोरांना आळा घालण्यासाठी महावितरणाच्या वतीने शहरात डेटा कॉन्सन्ट्रेटर युनिट बसवण्यात येणार आहेत. महावितरणाच्या परिमंडळातील मुलुंड, भांडूप आणि ठाणे याठिकाणी एकूण ५३० डिसीयू बसवण्यात येणार आहे. विज चोरीचा प्रकार वाढल्याचे पाहून महावितरण मंडळाने ही नवी शक्कल लढवली आहे. अद्याप ही यंत्रणा कार्यारत झालेली नाही. मात्र ही यंत्रणा सुरु झाल्यानंतर विजचोरांचे पितळे उघडे पडणार आहे.

ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा, दिवा आणि शीळ परिसरात वीजचोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही कल्पना महावितरण परिमंडळातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना ही योजना सुचली. सध्या या विभागात एकही डीसीयू यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यातील या विभागात डीसीयू बसविले जातील, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

डेटा कॉन्सन्ट्रेटर युनिट हे रेडिओतील लहरींच्या तत्त्वावर चालते. मानवरहीत असलेली ही प्रणाली ३०० मिटर परिघातील सर्व रेडिओ संदेश अधिग्रहीत करेल. अचूक मीटर वाचन करण्यास त्याचा उपयोग होऊ शकेल. दर १५ मिनिटांनी विशिष्ट ग्राहकाने किती वीज वापरली, हेसुद्धा या यंत्रणेद्वारे कळू शकणार आहे. डीसीयू यंत्रणा बसविलेल्या परिसरात कुठे वीजचोरी होत असेल, तर त्वरित त्याची माहिती केंद्रीय सर्व्हरवर मिळेल. लातूरमध्ये याच यंत्रणेच्या माध्यमातून वीजचोरीची ३३ प्रकरणे पकडण्यात आली.

First Published on: June 24, 2019 3:20 PM
Exit mobile version