महाराष्ट्राने पुढाकार घेऊन भारताची दुसरी राजधानी…; प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

महाराष्ट्राने पुढाकार घेऊन भारताची दुसरी राजधानी…; प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज (17 जून) छत्रपती संभाजीनगरपासून 24 किमी अंतरावर असलेल्या खुलताबाद येथे औरंगजेबाच्या मजारीला भेट दिली. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना प्रकाश आंबेडकर यांनी मजारला भेट दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फुटणार हे नक्की. (Maharashtra took the initiative to become the second capital of India…; Big statement of Prakash Ambedkar)

उद्धव ठाकरे यांचे मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगजेबाच्या मजारला भेट दिली. यावेळी त्यांनी मजारवर पुष्प अर्पण केले आणि मस्तक टेकवले. प्रकाश आंबेडकर यांनी असे केल्यामुले आधीच सुरू असलेल्या औरंगजेब वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत सापडणार आहेत. कारण राज्यात सत्तेवर असलेले शिंदे-फडणवीस सरकाराला प्रश्न विचारण्याची आयती संधी आहे.

हेही वाचा – चर्चा तर होणारच : ‘वंचित’ नेते प्रकाश आंबेडकरांनी दिली औरंगजेबाच्या मजारला भेट

भारताची दुसरी राजधानी हे खुलताबाद करावी

औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, औरंगजेबाच्या समाधीला मी भेट दिली. येथील ऐतिहासिक वास्तू बघायला मी आलो आहे. औरंगजेबाने राज्यावर 50 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. तुम्ही ही वस्तुस्थिती पुसून टाकू शकता का? बाबासाहेबांनी सांगितले, औरंगजेबाचे राज्य आले जयचंद यांच्यामुळे आले. त्यामुळे शिवी द्यायची असेल तर जयचंदला द्या, औरंगजेबाला का? जयचंदमुळे बाह्य शक्ती प्रबळ झाल्या. यात औरंगजेबाचा काय दोष?, असे प्रश्न उपस्थित करत आंबेडकर म्हणाले की, मी औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याने ठाकरेंची कोंडी अजिबात होणार नाही. कारण तुघलक काळापासून औरंगाबाद ही दुसरी राजधानी आहे, महाराष्ट्राने पुढाकार घेऊन भारताची दुसरी राजधानी हे खुलताबाद (Khultabad) करावी.

मुख्यमंत्री असतो तर दंगली 2 दिवसात दडपून टाकली असती

गेल्या काही दिवसात औरंगजेबामुळे झालेल्या दंगलीबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले की, माझ्यासारखा मुख्यमंत्री असता दंगल अजिबात झाली नसती आणि झाली तर ती मी 2 दिवसांत दडपून टाकली असती. वादाचा विषय होऊ देतात म्हणून वाद वाढतात, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर केला.

 

First Published on: June 17, 2023 6:34 PM
Exit mobile version