घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरचर्चा तर होणारच : 'वंचित' नेते प्रकाश आंबेडकरांनी दिली औरंगजेबाच्या मजारला भेट

चर्चा तर होणारच : ‘वंचित’ नेते प्रकाश आंबेडकरांनी दिली औरंगजेबाच्या मजारला भेट

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : राज्यात राजकीय वर्तुळात काही घडले की, चर्चांना उधाण येते. अशीच एक मोठी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसत राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज (17 जून) छत्रपती संभाजीनगरपासून 24 किमी अंतरावर असलेल्या खुलताबाद येथे औरंगजेबाच्या मजारीला भेट दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना प्रकाश आंबेडकर यांनी मजारला भेट दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (There will be discussion: ‘Deprived’ leader Prakash Ambedkar visited Aurangzeb’s shrine)

कोल्हापुरात काही तरुणांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर औरंगजेब आणि टिपू सुलतानचे फोटो ठेवल्यावरून स्थानिक हिंदू संघटनांनी आंदोलन पुकारले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा काढण्यास पोलिसांनी मनाई केल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले. त्यातच गंजी गल्ली परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अखेर पोलिसांना लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढले होते. याप्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. हा वाद आता मिटला असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारल भेट दिल्यामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू होणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, कोल्हापूर प्रकरणी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच मुलांना औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे स्टेट्स ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या मुलांनी कोल्हापूरमधील आंदोलनानंतर त्यांचे सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले होते. त्यामुळे त्यांनी ठेवलेले स्टेट्स परत मिळविण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच, ज्या कोणत्याही संघटनांनी आंदोलनासाठी जमा होण्याचे आवाहन केले होते किंवा कोणीही प्रक्षोभक वक्तव्य केले होते, अशा सर्व फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकरणांमध्ये या व्हिडीओच्या माध्यमातून कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या सर्व घटनेनंतर कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -