Maharashtra Weather Update: १-२ नोव्हेंबरला राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना Yellow Alert

Maharashtra Weather Update:  १-२ नोव्हेंबरला राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना Yellow Alert

ज्यात नोव्हेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे. नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्याने महाराष्ट्रातील अनेक भागात या दिवसात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. १ आणि २ नोव्हेंबर रोजी राज्यातील दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ४ ते १० नोव्हेंबर रोजी एक दाबाचे क्षेत्र दक्षिण पूर्व बंगलच्या उपसागरात तयार होणार आहे. मात्र हे क्षेत्र तीव्र न होता पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम हा ६ ते ११ नोव्हेंबर दरम्यान होताना दिसणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

१ आणि २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पावसासाठी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली,सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.  त्याचप्रमाणे २ नोव्हेंबर रोजी राज्यातील पुणे,रायगड,सोलापूर,उस्मानाबाद,लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत देखील तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

मागील काही महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. त्यामुळे १ आणि २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पावसासाठी शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे  येलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांतील गावांना तसेच तिथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा – दिवाळी झाली गोड! मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना २० हजार सानुग्रह अनुदान

First Published on: October 29, 2021 8:44 PM
Exit mobile version