…म्हणून अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही, दिपाली सय्यद यांचा फडणवीसांना टोला

…म्हणून अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही, दिपाली सय्यद यांचा फडणवीसांना टोला

राज्यसभा निवडणुकीचा निकाल नुकत्याच काही तासांपूर्वी जाहीर झाला आहे. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते मोठ्या जल्लोषात आनंद साजरा करत आहेत. दरम्यान शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. या ट्विटद्वारे दिपाली सय्यद यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक टिका केलेली आहे.

या ट्विटमध्ये दिपाली सय्यद म्हणाल्या की, “एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही, एका राज्यसभेने मुंबईचे महापौर बनता येत नाही, एका राज्यसभेने कोल्हापूर पोटनिवडणुक जिंकता येत नाही. १०६ काय १३० असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही”. असं ट्विट दिपाली यांनी केलं आहे.

या राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार उभे राहिले होते. सहाव्या जागेसाठी भाजपकडून कोल्हापूरचे धनंजय महाडिक उभे होते तर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार निवडणूकीसाठी उभे होते. या दोघांपैकी या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. ९ तासांपासून राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. निकाल जाहीर होताच भाजपचे तीन उमेदवार आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडूण आले आहेत.

 

First Published on: June 11, 2022 5:08 PM
Exit mobile version