महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक, आघाडीत कोंडी होत असल्याची काँग्रेसची तक्रार

महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक, आघाडीत कोंडी होत असल्याची काँग्रेसची तक्रार

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचं दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. आघाडीत कोंडी होत असल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. ऊर्जा किंवा महिला-बाल कल्याण खात्याला मिळाणारा निधी किंवा ओबीसी आरक्षणासंदर्भातील माहितीची देवाणघेवाण यासंदर्भात महाविकास आघाडीचा समन्वय वारंवार समोर आला आहे. त्यामुळे विरोधकांना टीका करण्यासाठी संधी मिळाली आहे.

महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक

मिनी विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला बंध कमकुवत झालेला परवडणार नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये आपली कोंडी होत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. अनेक काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावरून त्याची प्रचिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना महत्त्वाचं पाऊल उचलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तीनही पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा करणार

काही काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुचंबणा होत असल्याची तक्रार सुरू केलीय. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमधील ही धूसफूस थांबवण्यासाठी आणि काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी तीनही पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा करणार आहेत.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक खात्यांना मदत होत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली होती. ऊर्जा खात्यात थकबाकी आणि शेतकऱ्यांच्या वीज तोडणीची नामुष्की, आबोसी प्रश्न, ग्रामविकास ऊर्जा खातं बहुजन कल्याण या खात्यांमध्ये समन्वय दिसत नाही, अशी काँग्रेसची तक्रार आहे. त्यामुळे या सर्व कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे.


हेही वाचा : RRB NTPC: रेल्वे परीक्षेवरून हिंसक आंदोलन प्रकरणी खान सरांविरोधात एफआयआर दाखल, विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप


 

First Published on: January 27, 2022 11:36 AM
Exit mobile version