मराठा आरक्षणावर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक सुरू

मराठा आरक्षणावर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक सुरू

मराठा आरक्षण, महाविकास आघाडी नेते आणि कायदेशीर तज्ञ यांच्यात बैठक सुरू

मराठा आरक्षणाबाबतची एक अतिशय महत्वपुर्ण बैठक सध्या महाविकास आघाडीचे नेते आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे जेष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्यासोबत मुंबईत सुरू आहे. या बैठकीला कॉंग्रेसकडून अशोक चव्हाण, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती आहे. त्याशिवाय राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, अॅड. शिंदे, मराठा आरक्षण कामकाज उपसमितीचे सचिव शिवाजी जोंधळे, उपसचिव गुरव आदी अधिकारी देखील उपस्थित आहेत. येत्या १७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

याआधीच पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश तसेच नोकऱ्यांमध्ये मराठा आरक्षण लागू लागू करायचे किंवा नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्यावेळीच १७ मार्चपासून मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच मराठा आरक्षण अंमलबजावणी येणाऱ्या शासकीय पातळीवर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे समजते.

सत्ता स्थापनेआधी सेटींग – देवेंद्र फडणवीस 

विरोधी पक्षाने मुस्लिम आरणक्षाचा परिणाम हा मराठा आरक्षणाचा मुस्लिम समाजासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणाचा परिणाम हा मराठा आरक्षणावर होईल, अशी टीका विरोधकांनी केली आहे. भाजपने ठाकरे सरकारच्या मुस्लिम आरक्षणाला विरोध केला आहे. सत्ता स्थापन करण्यापूर्वी शिवसेनेची आघाडीतील घटक पक्षांसोबत काय सेटींग झाली होती असा सवालही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. विधानपरिषदेमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना सरकारी शिक्षण संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देणारा अध्यादेश काढण्याची घोषणा केल्यानंतर त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे.

First Published on: February 29, 2020 12:37 PM
Exit mobile version