करोना टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट करा – आरबीआय

करोना टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट करा – आरबीआय

करोना टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट करा - आरबीआय

करोनापासून आपला बचाव करण्यासाठी एखाद्याला पेमेंट करताना नोटांऐवजी डिजिटल पेमेंट पर्यायाचा वापर करा, असे ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ (आरबीआय)ने सांगितले आहे. वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी बिलाचे पेमेंट तसेच फंड ट्रान्सफरसाठी एनईएफटी, आयएमपीएस, यूपीआय आणि बीबीपीएस यांसारख्या पर्यायांचा २४ तास वापर करता येईल, असेही रिझर्व्ह बँकेने सूचित केले आहे.

 

करोना टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट करा – आरबीआय

 

पेमेंटसाठी नागरिक आपल्या उपयुक्ततेनुसार, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, कार्ड यांसारख्या डिजिटल पेमेंट पर्यांयांचा वापर करू शकतात. यामुळे पैसे काढण्यासाठी किंवा बिल चुकविण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे ते टाळू शकतील, असे आरबीआयने सांगितले आहे.

First Published on: March 16, 2020 11:12 PM
Exit mobile version