सिगारेट पिऊन काडी फेकणं बेतलं जीवावर

सिगारेट पिऊन काडी फेकणं बेतलं जीवावर

दारू किंवा सिगारेटसारखे घटक शरीरासाठी घातक असून त्याचा नशा करणारे अनेक लोक आहेत. दारू पित असताना सोबत सिगारेट लागतेच.. असं तौऱ्यात सांगणारेही बरेच आहेत. मात्र, दारुच्या नशेत सिगारेट पेटवणं पिंपरी-चिंचवडमधील एका वृध्दाच्या जीवावर बेतलं आहे. दारू पित असताना या वृद्ध व्यक्तीने सिगारेट पेटवली आणि त्यानंतर माचिसची पेटती काडी बसल्याजागीच टाकून दिली. जळत्या काडीमुळे तिथे असलेल्या गवताने एकाएकी पेट घेतला आणि आग लागली. काय झालंय हे कळण्याआधीच खूप उशीर झाला होता. गवताला लागलेल्या आगीमध्ये तो वृद्ध पन्नास टक्के भाजला. अशोक जाधव (६५) असं या भाजलेल्या वृद्धाचे नाव आहे.

शनिवारी रात्री अशोक एका मोकळ्या गवताळ प्रदेशात दारू प्यायला बसले होते. दारू पित असताना त्यांनी सवयीप्रमाणे जवळची सिगारेट पेटवली आणि सिगरेट पेटवण्यासाठी वापरलेली माचिसची जळती काडी गवतावरच टाकून दिली. बहुधा अशोक ती काडी विझेल अशा अपेक्षेत असावेत. मात्र, जळत्या काडीमुळे गवताने पेट घेतला आणि बघता बघता ही आग पसरत गेली. दारूच्या नशेत असल्यामुळे अशोक यांना काय करावं हे लक्षात आलं नाही. यादरम्यान वाढत गेलेल्या आगीच्या विळख्यात ते सापडले आणि पन्नास टक्के भाजले. या अपघातानंतर दोन तरुणांनी त्यांना घरी आणून सोडले. अशोक गांभीर भाजल्याचं लक्षात येताच, त्यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक जाधव हे त्यांच्या पत्नी आणि मेहुणीसोबत पिंपरीमध्ये वास्तव्याला आहेत. याआधी आठ महिन्यांपूर्वी अशोक जाधव एकाएकी हरवल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी यावेळी दिली.


वाचा: स्थानकातून सुटताना मध्य रेल्वे देणार ‘हा’ इशारा

First Published on: January 13, 2019 3:36 PM
Exit mobile version