घरमुंबईस्थानकातून सुटताना मध्य रेल्वे देणार 'हा' इशारा

स्थानकातून सुटताना मध्य रेल्वे देणार ‘हा’ इशारा

Subscribe

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी हे नक्की पहा

लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. हजारोंच्या संख्येने मुंबईकर दररोज या लोकलने प्रवास करतात. मात्र याच लोकलमुळे दिवसागणिक अपघात होताना दिसत आहेत. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मध्य रेल्वे सातत्याने काही ना काही प्रयत्न करताना दिसते. नुकताच मध्य रेल्वेने एक नवीन प्रयोग केला आहे. यासाठी रेल्वेला विशिष्ट प्रकाराचे इंडिकेटर लावण्यात आले असून त्याद्वारे प्रवाशांना लोकल सुरु होणार असल्याचे सूचित केले जाणार आहे.

असा आहे मध्य रेल्वेचा संकेत

मध्य रेल्वेने डब्यांना इंडिकेटर लावले आहेत. हे इंडिकेटर निळ्या रंगाचे असून गाडी सुटण्याच्या वेळी हा निळा लाईट ब्लिंक होणार आहे. त्यामुळे एकदा निळा लाईट ब्लिंक झाला याचा अर्थ ती ट्रेन सुटणार असल्याचा इशारा असणार. त्यामुळे एकदा जर निळा लाईट ब्लिंक झाला तर प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढू नये.

- Advertisement -

यामुळे अपघातात होईल घट

रेल्वे सुरु झाल्यावर अनेक प्रवासी गाडी पकडण्यासाठी धावपळ करतात. अशावेळी अपघात होण्याची शक्यता अधिक असते. हे टाळण्यासाठी मध्ये रेल्वेने डब्यांना इंडिकेटर लावले आहेत. यामुळे अपघात होण्याची संख्या घटेल अशी शक्यता रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत दिली आहे. यामध्ये त्यांनी हा निळ्या रंगाचा लाईट कशाप्रकारे असेल याचा एक व्हिडिओही अपलोड केला आहे. हे ट्विट आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिली आहे. यामुळे निळा लाईट ब्लिंक कसा होणार हे पाहता येणार आहे. याआधी गाडी सुरु झाली की केवळ हॉर्न वाजत असेल पण आता त्यामध्ये या लाईटची भर पडणार आहे. सेंट्रल रेल्वेने त्यांचे हे ट्विट रिट्विट केले आहे. तसेच गोयल यांनी Safety First असे म्हटले आहे.

- Advertisement -

वाचा – मागितले मध्य रेल्वेचे स्टेशन, माथी मारले बुलेट ट्रेन स्टेशन!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -