मस्करीची कुस्करी; बंदुकीची गोळी लागली आणि…

मस्करीची कुस्करी; बंदुकीची गोळी लागली आणि…

प्रातिनिधिक फोटो

कोणत्या गोष्टींशी खेळायचं आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या याचा देखील एक मापदंड ठरलेला असतो. बऱ्याच वेळेला मस्करी अंगाशी देखील येते. किंवा ती जीवावर देखील बेतते. असाच काहीसा प्रकार ठाण्यामध्ये घडला आहे. ठाण्यामध्ये बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे एक जण जखमी झाला आहे. बंदुक बघता बघता चाप ओढला गेला आणि त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. किसान नगर येथे १८ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. दोन – तीन मित्र एक गावठी बंदुक पाहत होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा देखील चालू होती. बंदुक पाहत असताना चुकीनं बंदुकीचा चाप ओढला गेला आणि गोळी थेट एकाच्या पोटात घुसली. विजय यादव वय वर्षे २० असं या जखमी तरूणाचं नाव आहे. दरम्यान, जखमीवर सध्या रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. याप्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आली आहे.

First Published on: December 19, 2018 2:47 PM
Exit mobile version