OBC Reservation : ओबीसी आरक्षणाची मागणी करत मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाची मागणी करत मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाची मागणी करत मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी नाशिकमधील तरुणाने मंत्रालयायासमोरील प्रवेशद्वारावर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा प्रयत्न फसला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव गजू घोडके असे तो नाशिकचा रहिवाशी तसेच ओबीसी सुवर्णकार समाजाचा प्रदेशाध्यक्ष असल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र हा विषय न्यायालयीय कचाट्यात अडकून आगामी महापालिका निवडणुका विना ओबीसी आरक्षण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे घोडके याने सांगितले.

मंडल आयोगाने ओबीसी म्हणजे जे बारा बलुतेदार आहेत, त्यांच्यासाठी २७ टक्के आरक्षण बहाल केले आहे. मात्र त्यावर भलत्याच लोकांनी डल्ला मारल्याने खरे ओबीसी अडचणीत सापडले आहेत. आता त्यांच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. जे खरे ओबीसी आहेत, ते आता राजकीय पटलावर दिसणार नाहीत. याच नैराश्यातून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे घोडके याने निवेदनात म्हटले आहे.

घोडके काय म्हणाले?

ओबीसी सुवर्णकार सामाचे प्रदेशाध्यक्ष घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून ओबीसीचं आरक्षण रद्द करण्यात आले आहेत. ओबीसींचे आरक्षण गेल्यामुळे ओबीसींना जनरलमधून निवडणूक लढवावी लागत आहे. कोर्टाने सुद्धा आदेश दिले की, ओबीसींना निवडणूक जनरलमधून लढवावली लागेल. राज्य सरकारलाही न्यायालयात अपयशी झाले आहेत. केंद्राने इम्पेरिकल डेटा न दिल्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागला नाही. आता ओबीसींनाही ओपन कोट्यातून निवडणुका लढवण्यात येत असून ओबीसी संपुन जाईल असे घोडके यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : सोमय्यांचे जरंडेश्वर साखर कारखान्यातून थेट अजित पवारांना आव्हान, कारखान्याचे मालक जाहीर करा?


 

First Published on: October 6, 2021 7:53 PM
Exit mobile version