सोमय्यांचे जरंडेश्वर साखर कारखान्यातून थेट अजित पवारांना आव्हान, कारखान्याचे मालक जाहीर करा?

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना दहशतीच्या जोरावर बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर असे होऊ देणार नाही.

kirit somaiya jarandeshwar karkhana
सोमय्यांचे जरंडेश्वर साखर कारखान्यातून थेट अजित पवारांना आव्हान, कारखान्याचे मालक जाहीर करा?

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कारखाना घोटाळा प्रकरणी थेट साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट दिली. जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांशी चर्चा केल्यानंतर सोमय्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. तुमच्यात हिंमत असेल तर कारखान्याचे मालक कोण जाहीर करावे असे सोमय्या यांनी म्हटलं आहे. जरंडेश्वर कारखाना सत्तेचा वापर करुन कवडीमोल भावात मिळवला असल्याचे सोमय्यांनी म्हटलं आहे. साखर कारखान्याच्या सभासदांना हा कारखाना मिळवून देणार असे आश्वासन सोमय्यांनी दिले आहे. जरंडेश्वर कारखान्यामध्ये गेल्यावर सोमय्यांचे सभासदांनी जंगी स्वागत केले परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्या प्रश्नी भाजप नेते यांनी साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यास भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले, साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना दहशतीच्या जोरावर बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर असे होऊ देणार नाही.तसेच आपण शेतकऱ्यांना हा कारखाना परत मिळवून देऊ असा विश्वास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वरच्या सभासदांना दिला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर गेले होते. यावेळी कारखान्यातील सभासदांनी सोमय्यांकडे कारखाना आपल्या दाब्यात यावा अशी मागणी केली आहे. सभासदांनी म्हटलं आहे की, कारखाना चांगल्याप्रकारे सुरु होता. परंतु कवडीमोल भावामध्ये कारखान्याचा व्यवहार करण्यात आला. कारखाना बेकारयदेशिररित्या कारखाना ताब्यात घेण्यात आला असल्याचे सभासदांनी सांगितले आहे. तसेच आम्हाला कारखाना पुन्हा मिळवून द्या अशी मागणीही किरीट सोमय्या यांच्याकडे करण्यात आली आहे.

सोमय्यांचे अजित पवारांना आव्हान

जरंडेश्वर कारखान्यातील सभासदांनी आपल निवेदन दिल्यावर सोमय्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर कारखान्याचे मालक कोण हे जाहीर करा असे आव्हान अजित पवारांना दिलं आहे. बेनामी कंपन्यांमधून गैरव्यवहार करुन हा कारखाना ताब्यात घेतला असल्याचा आरोप सोमय्यांकडून करण्यात आला आहे. परंतु जरंडेश्वर कारखाना आपल्या मालकिचा असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करावे असे सोमय्या यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल, क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची वकिलांची माहिती