Mansukh Hiren Death Case: हिरेन यांच्या मृतदेहावरील रुमाल वाझेचे

Mansukh Hiren Death Case: हिरेन यांच्या मृतदेहावरील रुमाल वाझेचे

मनसुख हिरेन यांच्या मृतदेहावरील रुमाल वाझेचे

मनसुख हिरेन हत्याप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मनसुख हिरेन यांच्या मृतदेहावर आढळलेले रुमाल हे सचिन वाझेने विकत घेतल्याचं समोर आलं आहे. हे रुमाल कळवा स्टेशन बाहेरुन खरेदी केल्याचं समोर आलं आहे. सटचिन वाझे ने ते तिथून खरेदी केल्याचे सीसीटिव्ही फुटेज NIA च्या हाती लागलं आहे.

मनसुख हिरन यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काही रुमाल सापडले होते. हे रुमाल सचिन वाझनेच खरेदी केले होते. हे रुमाल सचिन वाझेने कळवा स्टेशन बाहेरील रुमाल विक्रेत्याकडून खरेदी केल्याचं समोर आलं आहे. NIA च्या हाती या संदर्भातल सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. ४ मार्चला मनसुख हिरेनची हत्या झाली त्यावेळी सचिन वाझेने सीएसटी ते कळवा असा ट्रेनने प्रवास केला होता. त्यावेळी कळवा स्टेशनवर उतरून स्टेशनच्या बाहेरच हे रुमाल खरेदी केल्याचं तपासात समोर आलं आहे.

मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला त्यावेळी त्याच्या तोंडावर एक मंकी कॅप होती. मात्र आतमध्ये ५ ते ६ रुमाल घडी घालून ठेवण्यात आले होते. या रुमालांच्या फॉरेन्सिक चाचणीसाठी NIA ने हे रुमाल पुण्याच्या सीएफएसएल या फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत.

वाझेनंतर आता सुनील मानेची कार NIA ने केली जप्त

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA च्या अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सुनील माने याची कार NIA ने जप्त केली आहे. सुनिल माने याच्या घरी NIA नं काल रविवारी छापेमारी केली. यावेळी काही कागदपत्र आणि कार जप्त करण्यात आली. निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या कार जप्त होत असताना आता मानेचीही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.

First Published on: April 26, 2021 3:39 PM
Exit mobile version