शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा महत्वाचा अलर्ट !

शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा महत्वाचा अलर्ट !

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा असा एलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात दक्षिण कोकण,(रत्नागिरी, सिंदुदुर्ग ) गोवा बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतरत्र महाराष्ट्र मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. याचाच प्रभाव म्हणून कोकणात जोरदार पश्चिमी वारे वाहतील असेही त्यांनी सांगितले.

अनेक भागात सोयाबीन आणि भुईमुगाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुंबई हवावान विभागाने आगाऊ एलर्ट जारी केला आहे.

 

First Published on: September 19, 2020 11:29 AM
Exit mobile version