Maratha Reservation : येत्या अधिवेशनात मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार – चंद्रकांत पाटील

Maratha Reservation : येत्या अधिवेशनात मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार – चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनस्थळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी आंदोलनाचं नेतृत्त्व करत असलेले खासदार संभाजीराजे यांची भेट घेत पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे. मराठा समाजासाला आरक्षण मिळावं यासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्या, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल

वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

सर्वच जण काळ्या पोशाखात

यावेळी सर्वच आंदोलक काळ्या पोशाखात आले आहेत. स्वत: संभाजीराजेही काळ्या पोशाखात आले आहेत. सर्व आंदोलकांनी काळे कपडे घालतानाच तोंडावर काळा मास्क लावला आहे. सरकारचा निषेध करण्यासाठीच सर्वांनी काळा पोशाख परिधान केला आहे.

First Published on: June 16, 2021 10:46 AM
Exit mobile version