हेच का तुमचं हिंदुत्व? सुषमा अंधारे, उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी

हेच का तुमचं हिंदुत्व? सुषमा अंधारे, उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देव – देवतांविरोधात केलेल्या टीकेवरून आता मराठा युवा सेना आक्रमक झाली आहे. यावरून आता मराठा युवा सेनेने हेच का तुमचं हिंदुत्व? असा सवाल करत त्यांनी सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी केली आहे.

मराठा युवा सेनेने वसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात मुंबईत ठिकठिकाणी बॅनर झळकावले आहेत. शिवसेना भवन, दादर परिसर, मराठा युवा सेना मुंबईचे प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज चौक चेंबूर परिसरात हे बॅनर दिसले. या बॅनरवर सुषमा अंधारेंनी देवी देवतांबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य छापण्यात आली आहेत.

ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे सध्या राज्यभर महाप्रबोधन यात्रेतून विरोधकांचा समाचार घेण्यास आपले विचार मांडत आहेत. यासाठी ते राज्यभर दौरा करत आहेत. अंधारे यांनी अलीकडेच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ज्यानंतर त्या आपल्या भाषणातून विरोधकांवर टीकेची तोफ डागत आहेत. याचवेळी त्यांनी हिंदू देव देवतांवरही टीका केल्याचा आरोप मराठा युवा सेनेने केला आहे. राम आणि कृष्ण थोतांड आहे, मी राम आणि कृष्णाला मानणार नाही. ज्याच्या घरात लेकरू झालं त्यालाच माहीत नाही शंकर किती भोळा आहे, अशाप्रकारची वक्तव्य सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत यायच्या अगोदर केली होती, असा आरोप मराठा युवा सेनेने केला आहे.


हेही वाचा : डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण


First Published on: November 18, 2022 12:46 PM
Exit mobile version