रुग्णांची शोधमोहीम आणि देखरेखीत राज्याची यंत्रणा अपयशी – केंद्रीय पथकाचा अहवाल

रुग्णांची शोधमोहीम आणि देखरेखीत राज्याची यंत्रणा अपयशी – केंद्रीय पथकाचा अहवाल

मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाचा अधिक कहर! २४ तासांत १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

राज्यात कोरोनाची परिस्थइती दिवसागणिक बिकट होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राची तीस पथकं पाहणी करण्यासाठी आली होती. पाहणी केल्यानंतर केंद्रीय पथकाने एक अहवाल दिला आहे. या अहवालात महाराष्ट्राच्या कोरोना व्यवस्थापनात प्रचंड त्रुटी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रुग्णांची शोधमोहीम आणि देखरेखीत राज्याची यंत्रणा अपयशी ठरल्याचं केंद्रीय पथकाने म्हटलं आहे.

रुग्णांची शोधमोहीम आणि देखरेखीत यंत्रणा अपयशी ठरल्या असून महाराष्ट्राच्या कोरोना व्यवस्थापनात त्रुटी आहे, असा ठपका केंद्रीय आरोग्य पथकाने आपल्या अहवालात ठेवला आहे. तसंच केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याला पत्र पाठवून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक नियमांचं योग्य पालन होत नसल्याचं सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळून आल्याचं पथकाने म्हटलं आहे. नियमांच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय पथकाने व्यक्त केलं आहे. या अहवालातील गंभीर दखल घेण्याची गरज असलेल्या नोंदी केंद्रीय आरोग्य सचीव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांना पत्राद्वारे कळवल्या असून त्यात नमूद केलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची सूचना केली आहे.

कोरोना संदर्भात मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

कोरोनाच्या विस्फोटामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार ११ एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्रात ८ किंवा १४ दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे.

 

First Published on: April 12, 2021 12:53 PM
Exit mobile version